Agra News Saam
देश विदेश

Crime: घरातले गच्चीवर गेले, खोलीतून पुरूषाचा आवाज; पतीने पेटी उघडताच बिना कपड्यांचा बॉयफ्रेंड दिसला

Married Womans Lover Beaten by Husband in Agra: विवाहित महिलेला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराला पतीकडून बेदम मारहाण; पेटीत लपवलेला तरुण विवस्त्र अवस्थेत आढळला. गावकऱ्यांनी तरूणाला पोलिसांच्या स्वाधीन केले.

Bhagyashree Kamble

विवाहित महिलेला भेटण्यासाठी गेलेल्या प्रियकराला महिलेच्या पतीने बेदम चोप दिला आहे. आग्रा येथील फतेहाबाद पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. विवाहित महिलेचे एका पुरूषासोबत प्रेमसंबंध होते. प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर रात्री तिच्या खोलीत गेला. पतीला संशय आल्यानं त्याने घरात शोधाशोध केली. पेटी उघडताच त्यात विवस्त्र अवस्थेत पत्नीचा प्रियकर सापडला. या धक्कादायक घटनेनंतर याचा व्हिडिओही व्हायरल झाला.

फतेहाबाद पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात विवाहित महिलेचे एका तरूणासोबत जुळले होते. उकाडा वाढल्यामुळे विवाहित महिलेच्या घरातील सदस्य गच्चीवर झोपायला गेले. तिने तातडीने आपल्या प्रियकराला बोलावून घेतलं. तसेच महिला देखील त्याच्यासोबत घरीच खोलीत झोपायला गेली. दरम्यान काही वेळानंतर महिलेचा पती खाली त्यांच्या खोलीत गेला. तेव्हा एका पुरूषाचा आवाज आला. त्याने तातडीने घरातील इतर सदस्यांना बोलावून घेतलं.

घरातील सदस्यांनी संपूर्ण घराची चौकशी केली. महिलेने तातडीने आपल्या प्रियकराला एका पेटीत लपवून ठेवलं. नंतर पतीने खोलीची तपासणी केली, त्याची नजर पेटीवर गेली. पेटी उघडताच प्रियकर विवस्त्र अवस्थेत सापडला. पतीने त्याच क्षणी प्रियकराला बेदम चोप द्यायला सुरूवात केली. घरातील सदस्यांसह काही गावकरी मंडळींनीही तरूणाला बेदम चोप दिला.

गावकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्याला तातडीने पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूण बहा तहसीलचा रहिवासी आहे. त्याचे एक वर्षापासून विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. गावातच दोघे एकमेकांना भेटत असे. या प्रकरणी आता तक्रार दाखल केल्यानंतर तरूणावर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Repo Rate: होम लोन आणखी स्वस्त होणार; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपसोबतच्या तणावादरम्यान मंत्र्याचं मोठं विधान

Zodiac signs prediction: आजचा दिवस चार राशींसाठी बदल घडवणारा! निर्णय, नोकरी आणि प्रवासात मिळणार यश

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! चक्रीवादळामुळे बदलतंय हवामान, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

SCROLL FOR NEXT