Pakistan crime News saam tv
देश विदेश

धावत्या एक्स्प्रेसमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, तिकिट नसल्याने AC कोचमध्ये नेले

तीन नराधमांनी महिलेला तिकिट नसल्याने एसी कोचमध्ये नेले, त्यानंतर...

नरेश शेंडे

पाकिस्तान (Pakistan) मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुल्तानमधून कराचीला जाणाऱ्या बाहुद्दीन जाकारीया एक्स्प्रेसमध्ये तीन जणांनी विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार (Sexual assault) केल्याची धक्कदायक घटना नुकतीच घडलीय. या गंभीर घटनेमुळं पाकिस्तनात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

दरम्यान, पोलिसांनीही सदर घटनेची गंभीर दखल घेत (three culprit arrested) तीन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोघेजण जनरल तिकिट तपासणीस आहेत. तर एक जण त्यांच्या इन्चार्ज असल्याचं समजते. तिघांनी महिलेला तिकिट नसल्याने एसी कोचमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाहुद्दीन जाकारीया एक्स्प्रेसमध्ये विवाहित महिलेवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. या तिघा नराधमांनी महिलेवर अत्याचार करत असताना अश्लील व्हिडिओ बनवला. त्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोघेजण जनरल तिकिट तपासणीस आहेत. तर एक जण त्यांच्या इन्चार्ज असल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी तिघा आरोपींचे मोबईलही जप्त केले आहेत.

'बलात्कार करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. पाकिस्तान सरकार या प्रकरणाला दाबण्याच्या प्रयत्न करत होतं. मात्र, या घटनेनंतर सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर या प्रकरणाची तातडीनं दखल घेत पोलिसांनी अखेर तीन आरोपींना अटक केली, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे रेल्वे मंत्री साद रफिक यांनी दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Maharashtra News Live Updates: महायुतीची आज कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

SCROLL FOR NEXT