Vinod Tawde, the Marathi BJP strategist credited with crafting NDA’s winning formula in the Bihar Assembly elections. Saam Tv
देश विदेश

Vinod Tawde Bihar Role: बिहारच्या विजयामागे मराठी चेहरा, एनडीएच्या विजयाचे शिल्पकार तावडे?

NDA Bihar Victory: बिहार विधानसभा निवडणुकीत NDA नं ऐतिहासिक असं बहुमत मिळवलयं...मात्र बिहारच्या याचं विजयामागे मराठी चेहरा आहे... या मराठी चेहऱ्यानं बिहारचं राजकीय गणित 180 अंशात कसं फिरवलं... बिहारच्या विजयाची रणनिती कशी ठरली?

Bharat Mohalkar

बिहार निवडणुकीत पहिल्यांदा जेडीयू-भाजपला न भूतो न भविष्याती असं यश मिळालं. या यशामागे आहे भाजपचा एक मराठी चेहरा. त्यांचे नाव आहे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे. ज्यांनी बिहारच्या गुंतागुंतीच्या राजकीय समीकरण सोडवून यशाची नवी व्याख्या लिहिलीय.. बिहारमधील तब्बल 65 मतदारसंघ जिंकणं भाजपसाठी अशक्य मानलं जायचं... आणि याच ठिकाणी राजकीय आणि जातीय गणितं जुळवत एनडीएला त्यांनी मोठं यश मिळवून दिलंय.

खरंतर बिहारमधील 35 जागांवर यादव आणि मुस्लीम समाजाचा प्रभाव होता... तर 30 जागांवर दलित मतदारांचा प्रभाव होता... या 65 जागा जिंकण्यासाठी भाजप आणि जदयूने यादव, मुस्लीम आणि दलित मतदारांना आपल्याकडे वळवण्याची किमया केली.. त्यामुळेच 65 पैकी 30 जागा एनडीएला जिंकणं शक्य झालंय... दलित, यादव आणि मुस्लिम यांच्या गडात भाजपचं कमळ फुलवण्याची रणनिती नेमकी काय होती ऐका, सकाळ समूहाचे संपादक निलेश खरे यांच्याकडून

मराठमोळ्या विनोद तावडेंनी बिहार जिकण्यासाठी शड्डू ठोकला. भाजपाचा गढ काबिज करण्याची रणनिती 2022 पासून सुरु झाली होती. कारण नितीश कुमारांनी ऑगस्ट 2022 मध्ये भाजपची साथ सोडून राजद आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं.. हा भाजपसाठी मोठा धक्का होता... अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तावडेंकडे बिहारचं प्रभारीपद आलं... आणि त्यांनी आपल्या कुशल रणनीतीच्या जोरावर राजकीय सारीपाटावरच्या सोंगट्या फिरवल्या... आणि नितीश कुमारांना पुन्हा एकदा गळाला लावलं... ते नेमकं कसं?

खरंतर नितीश कुमार आणि चिराग पासवान यांच्यात अंतर्गत तीव्र संघर्ष होता.. मात्र भाजपला पासवान यांची व्होट बँक महत्वाची वाटत होती.. त्यामुळे नितीश कुमारांना राजकीय मजबुरीचं महत्व पटवून देत तावडेंनी पासवान आणि नितीश कुमारांना एकत्र आणलं.. एवढंच नाही तर नितीश कुमारांनी भाजप सोडून राजद आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं.. त्यानंतरही तावडेंनी नितीश कुमारांसोबत संपर्क कायम ठेवला.. मात्र तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यातील अंतर्गत धुसफूस वाढायला लागताच तावडेंनी नितीश कुमारांना आपल्याकडे वळवलं... त्यासाठी पडद्याआड तावडेंनी जागावाटप आणि सत्तेच्या समीकरणांबाबत यशस्वी बोलणी केली... त्यातूनच बिहारमध्ये एनडीए मजबूत झाली...

महाराष्ट्रातील विनोद तावडेंची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. राज्यातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडून राजधानीपर्यंत पोहचलेल्या विनोद तावडेंनी राहुल गांधींच्या काँग्रेस आणि लालूच्या राजदला घरचा रस्ता दाखवलाय. आणि याचमुळे राजधानीतल्या राजकीय वर्तुळात आता या मराठी चेहऱ्याची नव्यानं चर्चा सुरु झालीये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT