Meri Mati Mera Desh campaign Saam tv
देश विदेश

Meri Mati Mera Desh Campaign: शहीदांच्या स्मरणार्थ केंद्र सरकार राबवणार नवं अभियान; 'मन की बात' दरम्यान PM मोदींची मोठी घोषणा

Meri Mati Mera Desh Campaign: स्वातंत्र्य दिनाच्या आधीच नरेंद्र मोदी यांनी 'मेरी माटी, मेरा देश' या अभियानाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

Vishal Gangurde

Narendra modi News: पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी शहीदांच्या स्मरणार्थ मोठी घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या आधीच नरेंद्र मोदी यांनी 'मेरी माटी, मेरा देश' या अभियानाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'शहीदांच्या स्मरणार्थ 'मेरी माटी मेरा देश' अभियान राबविण्यात येणार आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मरणार्थ देशात विविध आयोजित केले जातील. देशातील लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिलालेख बसविण्यात येणार आहे. तसेच 'मेरी माटी मेरा देश' या अभियानांतर्गत 'अमृत कलश यात्रा' काढण्यात येणार आहे. (Narendra Modi Latest News)

'पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'देशभरातील गावा-गावांतून लोक ७५०० कलशात माती घेऊन 'अमृत कलश यात्रा' माध्यमातून दिल्लीत येणार आहे. त्याचबरोबर लोक वेगवेगळे रोपटे घेऊन येतील. राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ कलशातील माती आणि झाडे टाकून 'अमृत वाटिका' बांधण्यात येईल, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय आवाहन केलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'अमृत वाटिका 'एक भारत-श्रेष्ठ भारत' एक भव्य प्रतीक बनवण्यात येईल. मी गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरून २५ वर्षांच्या अमृतकालसाठी निश्चय केला होता. तसेच मोदींनी देशाच्या पवित्र मातीची शपथ घेताना 'युवा डॉट गॉव डॉट इन' या वेबसाइटवर आपले सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन केले.

यंदाही 'हर घर तिरंगा' मोहिम

पंतप्रधान मोदींनी गेल्यावर्षीप्रमाणे यावेळीही ''हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मोदी म्हणाले, ' प्रत्येक घराघरात तिरंगा फडकावयचा असून ही परंपरा पुढे चालू ठेवायची आहे. यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या शहीदांच्या बलिदानाची जाणीव होईल, या मोहिमेत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT