Arvind kejriwal news  saam tv
देश विदेश

Arvind Kejriwal | मनीष सिसोदियांना भारतरत्न दिला पाहिजे : अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सिसोदिया यांना अटक करण्याचे प्रयत्न होत आहे, खरंतर त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील कार्याविषयी भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहीजे, असे अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) म्हणाले.

Vishal Gangurde

Arvind kejriwal News : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर सीबीआयने छापा टाकल्यानंतर देशाच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहेत. तर दुसरीकडे मनीष सिसोदिया यांच्या शिक्षणाच्या मॉडलचे नुकतेच न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राने कौतुक केले आहे. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सिसोदिया यांना अटक करण्याचे प्रयत्न होत आहेत, खरंतर त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील कार्याविषयी भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहीजे, असे अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाधम्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मनीष सिसोदिया यांच्यावर भाष्य केलं. 'दिल्लीचे उपमु्ख्यमंत्री सिसोदिया यांचे न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राने कौतुक केले आहे, त्यामुळे मोदी सरकारकडून त्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. खरंतर त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. परंतु सिसोदिया यांना अटक होऊ शकते, असा संशय अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

केजरीवाल पुढे म्हणाले, 'मनीष सिसोदिया यांना अटक केली जाऊ शकते. पण काय माहित मलाही अटक होऊ शकते. हे सर्व आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडत आहे. गुजरातचे लोक दु:खी आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यावर गुजरातमधील लोकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्य सेवा प्रदान करू, असं आश्वासन केजरीवाल यांनी दिलं आहे.

दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी भाजपने त्यांना आम आदमी पक्ष फोडल्यास त्यांना मुख्यमंत्रिपद मिळेल, अशी ऑफर मिळाल्याचे सांगितले. तसेच त्यांनी भाजपच्या एका व्यक्तीकडून मला दोन प्रस्ताव मिळाले आहेत. एक मी आम आदमी पक्ष फोडल्यास माझ्यावरील सीबीआय-ईडी द्वारे दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येईल. तसेच आम आदमी पक्ष फोडल्यास मला मुख्यमंत्रिपद मिळेल'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

गौरी खानला शालिनी पासीबद्दल जाणवते चिंता, काय आहे नेमक कारण?

Viral Video: वाह! काटा लगा गाण्यावर लोकलमध्ये प्रवाशांची जुगलबंदी, आजोबांनाही केला हटके डान्स; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT