Manish Sisodia Saam Tv
देश विदेश

'आप' फोडा, भाजपात या, CBI चौकशी बंद करू; भाजपची मनीष सिसोदिया यांना ऑफर?

भाजपने आपल्याला ऑफर दिली असल्याचा दावा सिसोदिया यांनी केलाय.

साम टिव्ही ब्युरो

दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सध्या सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. लिकर धोरणासंदर्भात बदल केल्याने त्यांची चौकशी केली जात आहे. अशात सिसोदिया यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. आम आदमी पक्ष फोडा आणि भाजपात या, सर्व सीबीआय व ईडीच्या सर्व केस बंद करतो, अशी ऑफर आपल्याला भाजपने दिली असल्याचा दावा सिसोदिया यांनी केलाय. (Manish Sisodia Latest News)

यासंदर्भात सिसोदिया यांनी ट्विट केलं आहे. 'मला भाजपचा संदेश मिळाला आहे 'आप'फोडून भाजपमध्ये सामील व्हा, सीबीआय-ईडीची सर्व प्रकरणे बंद केली जातील. भाजपला माझे उत्तर- मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे, मी राजपूत आहे. मी माझे शीर धडावेगळे करेल, पण भ्रष्ट-कारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा'.अशी भूमिका ट्विटरवरून मांडली आहे.

भाजप नेते अगोदर पत्रकार परिषद घेतात आणि सीबीआय, ईडीच्या कारवाईची धमकी देतात. त्यानंतर लगेच या तपास संस्थांकडून कारवाई होते. महागाई अशीच वाढत राहिली पाहिजे आणि त्यास विरोधी पक्षांनी विरोध करु नये. अशी केंद्र सरकारची इच्छा असल्याचा आरोपही, सिसोदिया यांनी केला आहे. (Manish Sisodia Todays News)

अबकारी धोरणात करण्यात आलेल्या बदलाची चौकशी करण्याची शिफारस उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी CBI ला केली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात सीबीआयने सिसोदिया यांच्या दिल्लीतील निवासस्थानासह सात राज्यांत छापेमारी केली होती.

दरम्यान, 'गेल्या २७ वर्षात भाजपने गुजरातसाठी जे केले नाही, ते केजरीवाल सरकार करून दाखवेल. ज्या प्रकारचे काम दिल्लीत झाले आहे, तशा प्रकारचे काम सध्या पंजाबमध्ये सुरु आहे. या कामामुळे प्रभावित होऊन गुजरातची जनता केजरीवाल यांना एक संधी देऊ पाहत आहे'. असं देखील सिसोदिया यांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी देखील सिसोदिया यांना जाणीवपूर्वकपणे अबकारी धोरण प्रकरणात अडकवले जात असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT