Manipur Violence  Saamtv
देश विदेश

Manipur Violence: धक्कादायक! मणिपूरमधील हिंसाचारात 54 जणांचा मृत्यू, परिस्थिती नियंत्रणासाठी 10,000 जवान उतरले रस्त्यावर

Manipur Violence Latest News: पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे

Gangappa Pujari

Manipur Violence: मागील काही दिवासंपासून मणिपूरमध्ये हिंसाचार भडकला आहे. याबद्दलची सर्वात महत्वाची बातमी समोर आली असून या घटनेमध्ये आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १० हजार जवान उतरले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मणिपूरमधील हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, मणिपूरमध्ये आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. 54 मृतांपैकी 16 जणांचे मृतदेह चुराचंदपूर जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत, तर 15 मृतदेह जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, इम्फाळ पूर्व येथे आहेत.

तसेच ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सचे सुमारे 10,000 जवान राज्यात तैनात करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

मेरी कोमने मागितली होती मदत...

भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉमने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे मदत मागितली होती. मेरी ट्विट केलं होतं. "माझं राज्य मणिपूर जळत आहे. कृपया मदत करा" असं म्हटलं होतं. तसेच या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग करत मणिपूरमधील जाळपोळ, हिंसाचाराचे काही फोटो शेअर केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT