ManipurViolence saam tv
देश विदेश

दोन वाहनांवर अंदाधुंद गोळीबार, दोन महिलांसह चौघांचा मृत्यू

Manipur Violence Latest News Today: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची घटना घडली आहे. उखरुल जिल्ह्यात संशयित उग्रवाद्यांनी दोन वाहनांवर केलेल्या गोळीबारात दोन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला.

Omkar Sonawane

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना समोर आली आहे. उखरून जिल्हयात संशयित उग्रवाद्यांनी दोन वाहनांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दोन महिलांसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने ही माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, शुक्रवारी इम्फाळ उखरुल मार्गावरील न्यू हेवन परिसरात ही घटना घडली. काही सशस्त्र उग्रवाद्यांनी दोन चारचाकी वाहनांना लक्ष्य करत गोळीबार केला. या दोन्ही वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्या दोन पुरुष आणि दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोन्ही वाहनांच्या समोरील काचांवर गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

दरम्यान याच्या एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी कांगपोकपी जिल्ह्यातही संशयित उग्रवाद्यांकडून गोळीबाराची घटना घडली होती. दोन बंडखोर गटांमध्ये झालेल्या चकमकीत एका कुकी महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य दोन पुरुष जखमी झाले होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास तापहोउ कुकी गाव आणि शेजारील सेनापती जिल्ह्यातील कैलेन्गजांग परिसरादरम्यान ही गोळीबाराची घटना घडली. यावेळी दोन बंडखोर गटांमध्ये संघर्ष झाला.

या गोळीबारात तापहोउ कुकी गावातील ४३ वर्षीय चोंगलोई यांचा मृत्यू झाला. त्या जवळच्या शेतात काम करत होत्या. गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी त्यांच्या हातात विळा होता. या घटनेत एस. डेव्हिड चोंगलोई (वय ३४) आणि लमखोचोन चोंगलोई (वय ४६) हे दोन पुरुष जखमी झाले. त्यांना कांगपोकपी जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर राज्याच्या मुख्यमंत्री नेमचा किपजेन यांनी महिलेच्या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. तसेच या प्रकरणाची तातडीने, सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. सलग दोन दिवस घडलेल्या हिंसक घटनांमुळे मणिपूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda: 'प्यार करते हैं और करते रहेंगे...'; गोविंदासोबत रानी स्वर्णकारचे रोमँटिक फोटो व्हायरल

Stress And Blood Pressure: वयाच्या २०-३० व्या वर्षीच बीपी वाढतोय? तुमच्या रोजच्या 'या' ५ सवयी ठरतायेत घातक

अकलूजच्या घोडेबाजारात 8 दिवसांत अडीच कोटींची उलाढाल; दुष्काळामुळे खरेदी-विक्रीत ३० टक्क्यांची घट

भाडेकरार संपल्यानंतर घर रिकामं केलं नाही तर काय होणार? पोलीस काढणार घराबाहेर, काय आहे कायदा?

Maharashtra News Live Update: सोन्याचे ७ हंडे शोधण्यासाठी अघोरी पूजा? जालन्यातील धक्कादायक प्रकार उघड

SCROLL FOR NEXT