Manipur Firing 
देश विदेश

Manipur Firing: मणिपूर पुन्हा पेटलं; रॉकेट हल्ल्यानंतर गोळीबार, ५ जणांचा मृत्यू

Manipur Firing: मणिपूर पुन्हा एकदा पेटलंय. बंडखोरांनी आता थेट रॉकेट हल्ला केलाय. रॉकेट हल्ल्यानंतर गोळीबार झाला. या गोळीबारीच्या हल्ल्यात ५ जणआंचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये कुकी आणि मैतेई या दोन्ही समजातील लोकांचा समावेश आहे.

Bharat Jadhav

मणिपूरमध्ये मागील वर्षापासून तणावाची स्थिती असून तेथे जागोजागी कुकी आणि मैतैई यांच्यात वाद सुरूय. मणिपूरच्या बिष्नपूरमध्ये बंडखोरांनी रॉकेट हल्ला केल्यानंतर तेथे गोळीबार केला. यात कमीत कमी ५ जणांचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, दारुगोळा एका लांब पाईपमध्ये भरून रॉकेट लाँचरच्या साहाय्याने हल्ला केला गेला असावा,अशी शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवलीय.

दरम्यान हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढू शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवलीय. बंडखोर इतके उग्र झालेत की, ते झोपलेल्या व्यक्तीला सुद्धा गोळ्या झाडत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीला तशाच प्रकारे मारण्यात आलं. या गोळीबाराच्या घटनेत अजून इतर ४ जणांचा मृत्यू झाला. या लोकांकडे शस्त्र होती अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळ साधारण ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका घरात राहणाऱ्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या ७ किलोमीटर अंतरावर दोन गटात गोळीबारीची घटना घडली. यात डोंगराळ भागातील बंडखोरांसह इतर चार बंडखोरांचा मृत्यू झाला.

गोळीबाराची घटना कुकी आणि मैतेई या दोन समुदायातील बंडखोरांमध्ये झाला. मागील काही दिवसांपासून या दोन्ही गटात तणाव वाढलाय. बिष्णुपूरमध्ये शुक्रवारी रात्री एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. तसेच २ मणिपूर रायफल्स आणि ७ मणिपूर रायफल्सच्या मुख्यालयातून शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडलीय.

मागील १७ महिन्यापासून मणिपूरमध्ये हिंसा सुरू आहे. मात्र या हिंसाचारात रॉकटेचा वापर करण्यात आला नव्हता. मणिपूरच्या हिंसाचारात पहिल्यांदा रॉकेटचा वापर करण्यात आला. या रॉकेटची लांबी सुमारे चार फूट असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शनिवारी राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. मणिपुरात गेल्या वर्षाच्या ३ मेपासून जातीय हिंसाचार उफाळून आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान! अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देताय? थेट वडिलांवरच गुन्हा दाखल, मुंबईतील प्रकरणामुळे खळबळ

Sugar Free Tea: साखर न टाकता चहा लागेल गोड! ‘ही’ एक सोपी ट्रिक आजच करून पाहा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००?

Maharashtra News Live Update: साखरेचे दर वाढल्याने धार्मिकस्थळी प्रसाद महागणार

Manoj Jarange : मनोज जरांगेंचा इशारा, सरकार अलर्ट मोडवर; ३ कॅबिनेट मंत्री अन् १ आमदार आज अंतरवाली सराटीत

SCROLL FOR NEXT