Manipur Latest News : मणिपूरमध्ये सुरक्षा दलाने मोठी कारवाई कारवाई केली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाने सोमवारी ११ समाजकंटकांचा खात्मा केला. एका समाजातील काहींनी सोमवारी दुपारी ३.३० वाजता पोलीस स्टेशनवर हल्ला केला. त्यानंतर सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ११ समाजकंटक मारले गेले आहेत. तर यामध्ये सीआरपीएफचा एक जवानही गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेत मारल्या गेलेल्या समाजकंटकाकडे ४ एसएलआर, ३ एके-४७, एक आरपीजी सहित अन्य हत्यारे सापडली आहेत. या समाजकंटकांनी काही घरांना आग लावली. जिरीबाम जिल्ह्यातील बोरोबेकरा पोलीस स्टेशनवर हल्ला केला. त्यांनी काही राऊंड गोळीबार देखील केला. यानंतर केलेल्या प्रत्युत्तरात ११ समाजकंटक मारले गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरोबकरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील समाजकंटकांनी दुसऱ्या समाजाच्या तीन ते चार रिकाम्या घरांना पेटवून दिलं. त्यानंतर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. या परिसरात सीआरपीएफ, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिसांना घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.
पोलीस स्टेशनच्या गेटजवळील घरे पेटवण्यात आली. त्यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यानंतर समाजकंटकांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. या घटनेत ११ समाजकंटक मारले गेले. अनेकदा समाजकंटकांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हत्यारे असणाऱ्या समाजकंटकांनी एका समाजाच्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला. या हल्ल्यानंतर पोलीस आणि बीएसएफची टीम घटनास्थळी पोहोचली. समाजकंटक आणि बीएसएफ जवानांमध्ये चकमक झाली.
ही चकमक ४० मिनिटे चालली. समाजकंटकांनी केलेल्या गोळीबारात बीएएसफची चौथी महार रेजिमेंटचा एक जवान जखमी झाला. मणिपूरमध्ये गेल्या चार दिवसांत ८ वा हल्ला आहे. बीएसएफ आणि सीआरपीएफचे १-१ जवान जखमी होण्याव्यतिरिक्त २ महिला आणि १ डॉक्टरचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.