Mamata Banerjee seen reacting angrily during a protest march in Kolkata, as a viral video captures her slapping a party worker. saam tv
देश विदेश

ममता बॅनर्जी पुन्हा संतापल्या! थेट TMC कार्यकर्त्याला कानशिलात लगावली; व्हिडिओ व्हायरल होताच राजकारण तापलं

Mamata Banerjee Slaps TMC Worker Viral Video: पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलनादरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्याला चापट मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेवर भाजपकडून टीका होत असून राजकीय वातावरण तापले आहे.

Omkar Sonawane

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी बुधवारी पक्षाच्या एका आंदोलनादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याला चापट मारल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक व्यक्ती गर्दी नियंत्रणात ठेवण्याचा आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, काही वेळातच ममता बॅनर्जी यांचा संयम सुटला आणि त्यांनी त्या कार्यकर्त्याला चापट मारली.

भाजप खासदारांचा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा

या घटनेचा व्हिडिओ भाजप खासदार राजू बिस्ता यांनी सोशल मीडियावर शेअर करत ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी X वर पोस्ट करत लिहिले की, “TMC च्या आंदोलनादरम्यान ममता बॅनर्जी यांनी एका व्यक्तीला चापट मारली. तो व्यक्ती गर्दी नियंत्रित करण्याचा आणि त्यांच्यासाठी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, ममता बॅनर्जी यांनी आपला संयम गमावला आणि स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या कानाखाली मारली.

विरोध मोर्चात ममता बॅनर्जी सहभागी

दरम्यान, बारुईपूर येथे ११ वर्षीय मुलीवरील बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी यांनी विरोध मोर्चा काढला होता. या मोर्चाला परवानगी देणाऱ्या कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसारखे काम केल्याचा आरोप त्यांनी केला. दक्षिण कोलकात्यातील हाजरा क्रॉसिंग येथे मोर्चाच्या समारोपानंतर आयोजित सभेत बोलताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला, भाजप समर्थकांनी मोर्चात अडथळा आणला आणि मार्गात अनेक ठिकाणी TMC कार्यकर्त्यांवर हल्ले केले.

हायकोर्टाने आमच्या मोर्चाला परवानगी दिली होती, तरीही भाजप कार्यकर्त्यांनी तो रोखला. पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाकडे दुर्लक्ष कसे केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पोलिस सामान्य नागरिकांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरत आहेत आणि आमच्या कार्यक्रमात अडथळा आणण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. या मोर्चादरम्यान भाजप आणि TMC युवक कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीचा मोठा फटका विद्यार्थ्यांना, ३१४ विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेला मुकले

मोठी बातमी! नाशिकच्या सहा तालुक्यातील शाळांना उद्या सुट्टी

Thursday Horoscope : मेहनतीचं फळ मिळणार, 5 राशींच्या व्यक्तींना पैशाची तंगी; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

पावसाळ्यात लाईटभोवती फिरणारे कीटक होतील गायब! वापरा हे 8 सोपे घरगुती उपाय

बँक हमीपत्रांवरील मुद्रांक शुल्कात मोठा बदल; उद्योगांना दुहेरी शुल्कातून दिलासा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT