India Alliance Meeting  Saam Tv
देश विदेश

India Alliance च्या अध्यक्षपदी खरगे? नितीश कुमार संयोजकपदी, आजच्या बैठकीत काय झाली चर्चा?

India Alliance Meeting: इंडिया आघाडीची आज व्हर्च्युअल बैठक झाली आहे. बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांची इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

Satish Kengar

India Alliance Meeting:

इंडिया आघाडीची आज व्हर्च्युअल बैठक झाली आहे. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर मुख्यमंत्री आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार याची आघाडीच्या संयोजकपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

आजच्या व्हर्च्युअल बैठकीत उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव उपस्थित नव्हते. बैठकीत जागावाटपाबाबतही चर्चा झाली आहे. सूत्रांनी सांगितलं की, आजच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर या तिन्ही अनुपस्थित नेत्यांशी चर्चा करून पुढे निर्णय घेतला जाईल.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जेडीयूच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी अध्यक्ष लालन सिंह आणि संजय झा सहभागी झाले होते. जेडीयू नेते संजय झा म्हणाले की, व्हर्च्युअल बैठकीत काँग्रेसने नितीश कुमार यांना संयोजक बनवण्याचा प्रस्ताव ठेवला. यावर नितीश कुमार म्हणाले की, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांपैकी कोणी एकाने इंडिया आघाडीचं अध्यक्ष बनायला हवं.   (Latest Marathi News)

संजय झा यांच्या म्हणण्यानुसार, नितीश कुमार यांनी संयोजक होण्यासाठी अद्याप संमती दिलेली नाही. बैठकीत नितीश कुमार म्हणाले, 'मला कोणत्याही पदात रस नाही. युती ग्राउंड लेव्हलवर पुढे जावी, अशी आमची इच्छा आहे. महाआघाडीत सामील असलेल्या पक्षांमध्ये एकवाक्यता असणे गरजेचे आहे.

नितीश कुमार म्हणाले की, जागावाटप हे सर्वात मोठे आव्हान आहे. मोठ्या पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित नसल्याबद्दल नितीश म्हणाले की, हे चांगले लक्षण नाही. ममता बॅनर्जी पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण देत बैठकीला हजर राहिल्या नाहीत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीला उपस्थित न राहण्यामागील कारण ममता यांची नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण नितीश कुमार यांना संयोजनक बनवण्यावर त्यांचे एकमत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT