Women Safety guide/ Yandex saam tv
देश विदेश

Women Safety Guide : महिलांच्या कपड्यांचे माप पुरूष टेलर घेऊ शकत नाही; महिला आयोगाचा प्रस्ताव

up women commission : महिलांच्या कपड्यांचे माप पुरूष टेलर घेऊ शकत नाही. उत्तर प्रदेश महिला आयोगाने तसा प्रस्ताव ठेवला आहे.

Nandkumar Joshi

उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगानं महिलांच्या सुरक्षिततेसाठी नव्याने मार्गदर्शक सूचना प्रस्तावित केल्या आहेत. कोणताही पुरूष टेलर महिलांच्या कपड्यांचे माप घेऊ शकत नाही, असा प्रस्ताव आयोगाकडून देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील राज्य महिला आयोगानं सार्वजनिक ठिकाणांवर महिलांच्या सुरक्षेसाठी नव्याने मार्गदर्शक सूचनांचा प्रस्ताव दिला आहे. महिलांच्या कपड्यांचे माप घेण्यास मनाई करण्याचेही महिला आयोगाच्या विचाराधीन आहे. कोणताही पुरूष टेलर महिलांच्या कपड्यांचे माप घेऊ शकत नाही, असा प्रस्ताव पॅनलकडून देण्यात आला आहे.

याशिवाय, जीम आणि योगा सेंटरमध्येही महिला ट्रेनर असायला हव्यात असेही आयोगानं म्हटलं आहे. जीम आणि योगा सेंटरमध्ये डीव्हीआर आणि सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात यावेत. स्कूलबसमध्येही महिला सुरक्षा रक्षक किंवा महिला शिक्षिका असायला हव्यात, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

महिला आयोगाच्या या प्रस्तावित सूचनांवर २८ ऑक्टोबर रोजी लखनऊमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती. महिला आयोगाच्या सदस्यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर चर्चा केली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महिला आयोगानं महिलांची सुरक्षितता आणि त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी काही निर्णय घेतले आहेत. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी व्हायची आहे. या प्रस्तावातील तरतुदींबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या प्रस्तावित सूचनांना मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी मसुदा तयार करण्यासाठी त्या सरकारकडे पाठवण्यात येणार आहेत.

कोचिंग सेंटरमध्ये सीसीटीव्ही

महिला आयोगाच्या प्रस्तावानुसार, बुटिकमध्ये महिलांच्या कपड्यांचे माप घेण्यासाठी महिला टेलर असावेत. तसेच त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही असावेत. याव्यतिरिक्त कोचिंग सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, चांगल्या स्वच्छतागृहांची सुविधा असावी. महिलांसाठीचे कपडे आणि वस्तू विक्री करणाऱ्या स्टोरमध्येही ग्राहकांच्या सेवेसाठी महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT