Cancer Drug Prices saam tv
देश विदेश

Cancer Drug Prices: कॅन्सरच्या औषधांच्या किमतीत मोठी कपात! 1364 औषधांची नवी MRP आजपासून लागू; रुग्णांना होणार 3540 कोटींचा फायदा

Cancer Medicines Price Cut: केंद्र सरकारने कॅन्सरच्या 1364 औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. 9 नोव्हेंबरपासून नवे दर लागू झाले असून, काही औषधांच्या किमतीत 96.45 टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे. पॅलबोप्रो आणि एबिरोन औषधांच्या नव्या किमती जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सरच्या रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कॅन्सरच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या 1364 औषधांची नवी किंमत आजपासून म्हणजेच 9 नोव्हेंबर 2026 पासून लागू झालीये. केंद्र सरकारने या औषधांच्या किमती कमी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता रुग्णांना कॅन्सरच्या औषधांसाठी पूर्वीपेक्षा कमी पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या किमतीपेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या मेडिकल दुकानदारांवर आणि रुग्णालयांवर कारवाई केली जाणार आहे.

राष्ट्रीय औषध किंमत नियंत्रण प्राधिकरणाने (NPPA) कॅन्सरच्या 137 औषधांच्या विक्रीवरील नफ्याची मर्यादा निश्चित केलीये. म्हणजेच या औषधांच्या विक्रीत दुकानदार आणि रुग्णालयांना ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नफा घेता येणार नाही.

तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनंतर निर्णय

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) 17 ऑक्टोबर 2026 रोजी एक तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या शिफारशींच्या आधारे औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 9 नोव्हेंबर 2026 पासून औषधांच्या नव्या किमती लागू करण्यात आल्या आहेत.

679 ब्रँडच्या औषधांच्या किमती 50 टक्क्यांपेक्षा जास्त कमी

8 नोव्हेंबर 2026 पर्यंत 85 औषध कंपन्यांनी कॅन्सरवरील 121 औषधांच्या एकूण 1364 प्रकारांची नवी किंमत जाहीर केलीये. यामध्ये 679 ब्रँडच्या औषधांच्या किमतीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे. काही औषधांच्या किमतीत तर तब्बल 96.45 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

या दरकपातीमुळे कॅन्सरच्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांचे दरवर्षी अंदाजे 3540.38 कोटी रुपये वाचतील असा अंदाज आहे. याशिवाय भारतात अद्याप उपलब्ध नसलेल्या 10 ते 15 औषधांनाही बाजारात आल्यानंतर या नियमांनुसार किंमत मर्यादा लागू होणार आहे.

40 हजारांची औषध आता फक्त 2720 रुपयांना

सरकारच्या या निर्णयामुळे काही महत्त्वाच्या औषधांच्या किमतीत मोठी घट झाली आहे. यामध्ये स्तनाच्या कर्करोगावर वापरल्या जाणाऱ्या औषधाचाही समावेश आहे.

पॅलबोप्रो (Palbopro)- आरपीजी लाइफ सायन्सेस कंपनीच्या या औषधाचा वापर ब्रेस्ट कॅन्सर उपचारासाठी केला जातो. पॅल्बोसिक्लिब 125 मिलीग्रॅमच्या या कॅप्सूलची किंमत पूर्वी 40,421.33 रुपये होती. आता ती कमी होऊन 2720 रुपये झाली आहे.

एबिरोन (Abiron)- अरविंकेअर फार्मा कंपनीच्या या औषधाचा वापर प्रोस्टेट म्हणजेच पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातो. एबिराटेरोन अॅसिटेट 250 मिलीग्रॅमच्या या गोळीची किंमत पूर्वी 41,250 रुपये होती. आता ही किंमत 3218.23 रुपये झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय ज्येष्ठ नेतेच घेतील; युगेंद्र पवार यांचे विधान

मुंबईत रॉकेट फटाके उडवण्यावर बंदी! महापालिका आयुक्तांचा मोठा निर्णय; प्रशासनाकडून आदेश जारी

वास्तुशास्त्रानुसार चप्पल आणि बूट ठेवण्याची योग्य दिशा कोणती?

Amla Oil: केसगळती कमी करून केसांना बनवा मजबूत आणि चमकदार! घरीच बनवा 'हे' तेल

Gokul President Election: मतदान आणि निकाल एकाच दिवशी लागणार! गोकुळच्या अध्यक्ष निवडणुकीवर हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT