काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षाने सचिवपदांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. देशातील राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी काँग्रेसने या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. एकूण ८१ पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी ४ नेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या आदेशानुसार या सचिवांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रासाठी ज्या ४ सचिवांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये यू. बी. वेंकटेश, रेहाना रियाज चिश्ती, एफ. एच. जक्कपनवर आणि योगेंद्र योगी यांची नावं आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत तेलंगणाचे प्रभारी तर मोहन जोशी कर्नाटकचे सचिव असणार आहेत. तर रवींद दळवी यांची पंजाब राज्याचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
काँग्रेस अध्यक्ष कार्यालयासाठी प्रणव झा आणि गौरव पांधी, माध्यम, प्रसिद्धी आणि सोशल-डिजिटल मीडिया विभागासाठी डॉ. विनीत पुनिया आणि रुचिरा चतुर्वेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशसाठी ६ सचिवांची नावं जाहीर केली आहेत. रामकिशन ओझा यांची गुजरातच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सूरज सिंह ठाकूर आणि रवींद्र दळवी यांच्याकडे पंजाबची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर नितीन कुंभलकर यांची कोष विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.
गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानसाठी प्रत्येकी ४ सचिवांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नव्या सचिवांच्या नियुक्त्या करताना काँग्रेस पक्षाने माजी एआयसीसी सचिव आणि सहसचिवांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले तर त्यांच्या कामाचे कौतुक केले. पृथ्वीराज साठे, अंबा प्रसाद, देवेंद्र यादव, दिव्या मदेर्णा यांसह २५ नेत्यांच्या कामाचे काँग्रेस पक्षाने कौतुक केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.