Parliament security  Loksabha Tv
देश विदेश

Parliament Security Breach : संसदेची सुरक्षा भेदली, २ अज्ञातांनी अचानक सभागृहात मारल्या उड्या, स्मोक कँडल फोडल्या, खासदारांची पळापळ

Parliament security : संसदेचे कामकाज चालू असताना दोन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. खासदार बसलेल्या बाकांवर या अज्ञातांनी उड्या मारल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला. संसदेवरील हल्ल्याला आज २२ वर्षे पूर्ण होत असताना ही बाब समोर आलीय.

Bharat Jadhav

Parliament Security Breach :

संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं घटना समोर आलंय. संसदेचे कामकाज चालू असताना दोन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. खासदार बसलेल्या बाकांवर या अज्ञातांनी उड्या मारल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला. संसदेवरील हल्ल्याला आज २२ वर्षे पूर्ण होत असताना ही बाब समोर आलीय. या अज्ञातांनी उड्या मारल्यानंतर स्मोक कॅण्डल पेटवल्या. या सर्व गोंधळामुळे खासदारांची पळापळ झाली.

काँग्रेस नेते (Congress leader) अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितले की, दोन जणांनी सभागृहात उड्या मारल्या. उड्या मारल्यानंतर त्यांनी काहीतरी फेकलं यामुळे गॅस निघू लागला. दरम्यान खासदारांनी या दोघांना पकडलं आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलं. सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजता तहकूब करण्यात आलं आहे.

संसदेचं हिवाळी सत्र चालू आहे, यादरम्यान संसदेच्या सुरक्षेत (Security Breach) मोठी चूक झाल्याचं समोर आलंय. संसदेच्या लोकसभेचं कामकाज चालू असताना दोन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या. यासर्व गोंधळामुळे सभागृहात खासदारांची(MP) पळापळ झाली. दरम्यान या दोघांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडलं आहे. सभागृहात उड्या मारणारे तरुण हे कर्नाटकाच्या म्हैसूर (Mysore) येथील खासदाराच्या शिफारशीने संसदेत (Parliament) आले होते. म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा आहेत.

आज सकाळी संसदेबाहेर काही लोकांनी गोंधळ घातला. संसदेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांनी या दोन्ही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आंदोलकांमध्ये एक महिला आणि एक पुरुष आहे. या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत. नीलम कौर सिंह असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिचे वय ४२ वर्ष आहे. तर ताब्यात असलेला दुसरा मुलाचं नाव अमोल शिंदे आहे. अमोल हा लातूर येथील असून त्याचे वय २५ आहे.

या घटनेवर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. भाजपचे खासदार सत्यपाल सिंह म्हणाले की, लोकसभेच्या शुन्य तासाचे कामकाज चालू असताना दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या. खाली उड्या मारल्यानंतर या दोघांनी आणलेल्या वस्तूमधून पिवळ्या रंगाची गॅस निघू लागला. हे सुरक्षेच्या अभावामुळे झालं आहे. लोकसभेच्या सुरक्षेचा भंग झालाय. दरम्यान या दोघांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडलं आहे.

तर काँग्रेस खासदार कार्तिक चिंदबरम म्हणाले की, दरम्यान २० वर्षानंतर दोन तरुण प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या बाकांवर उड्या मारल्या. त्यांच्या हातात एक डब्बा होता. त्यातून पिवळा धूर निघत होता. या दोघांपैकी जण थेट अध्यक्षांच्या खुर्चीकडे धावून जात होता. त्यांनी घोषणाबाजी केली. डब्यातून बाहेर निघणारा धूर हा विषारी असू शकत होता. संसदेवरील हल्ल्या होण्याच्या घटनेला आज २२ वर्ष होत आहेत, त्याचवेळी अशी घटना घडणं हे सुरक्षेचा भंग आहे.

तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेची चौकशी केली जात असल्याचं सांगितलं. "शून्य तासात घडलेल्या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. दिल्ली पोलिसांना आवश्यक सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, हा केवळ धूर होता यामुळे धुराची चिंता करू नका, असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT