Train Accident 
देश विदेश

Train Accident : एकच ट्रॅकवर २ मालगाड्या, जोरदार धडक, मोठं नुकसान, व्हिडीओ व्हायरल

Fatehpur Train Accident News: उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झालाय, एकाच ट्रॅकवर दोन मालगाड्या आल्यामुळे भीषण अपघात झालाय. या अपघातानंतर रेल्वेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात आले आहेत.

Namdeo Kumbhar

Fatehpur Train Accident : उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यात मोठी रेल्वे दुर्घटना टळली आहे. येथे एकाच ट्रॅकवर दोन मालगाड्या आल्या अन् जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की इंजिन रेल्वे रूळावरून खाली कोसळले. या अपघातामध्ये चालक आणि को पायलट गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय.

दोन मालगाड्या एकाच पटरीवर आल्यामुळे हा भीषण अपघात झाला. सध्या रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेचे कारण तपासले जात आहे. हा अपघात फतेहपूर जिल्ह्यातील खगा कोटवाली येथील पँबपिपूरजवळ झाला. अपघातानंतर दोन मालगाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार एक मालगाडी सिग्नलला थांबली होती. त्यावेळी दुसऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला. पण एकाच ट्रॅकवर दोन मालगाड्या कशा आल्या? हा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. अपघातानंतर पुन्हा एकदा रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

अपघाताची माहिती माहिती मिळताच रेल्वे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गाड्यांचे लोको पायलट जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मदत आणि बचाव कार्य सुरूच आहे. अपघातामुळे फ्रेट कॉरिडॉरवरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे समजतेय. अनेक मालवाहतूक गाड्या थांबविल्या गेल्या आहेत. काहींचे काही मार्ग बदलण्यात आले आहेत. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: या विकेंडला ट्रेकिंगचा प्लान करताय? पुण्याजवळ असलेले हे ३ किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे

आता गट राहिलेला नाही, शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT