bihar Election 2025 Saam tv
देश विदेश

Election 2025 : '१४ जानेवारीपर्यंत महिलांच्या बँक खात्यात ३०,००० रुपये जमा होणार'; निवडणुकीआधीच माजी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Bihar Election 2025 : निवडणुकीआधीच माजी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा केली आहे. महिलांच्या बँक खात्यात ३०,००० रुपये जमा होणार असल्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्र्यांनी केली.

Vishal Gangurde

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. यासाठी ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. याआधीच महागठबंधनचे मुख्यमंत्रि‍पदाचे दावेदार तेजस्वी यादव यांनी मोठी घोषणा केली आहे. तेजस्वी यादव यांनी महिलांना ३० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. महिलांना एकरकमी पैसे देण्याचे वचन दिलं आहे.

बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्व राजकीय पक्षातील नेते झाडून प्रचाराच्या कामाला लागले आहेत. अनेक नेत्यांनी मतदारांना विविध आश्वासनं दिले आहेत. या निवडणुकीदरम्यान आरजेडी नेते आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रि‍पदाचे दावेदार तेजस्वी यादव यांनी मकर सक्रांती म्हणजे १४ जानेवारी रोजी 'माई बहीण मान योजना'अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात वर्षाचे पूर्ण ३०००० रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे.

तेजस्वी यादव यांनी म्हटलं की, जाहीरनाम्यानुसार सरकारी कर्मचारी, पोलीस, आरोग्य कर्मचारी, शिक्षकांची बदली ही होम कॅडरच्या ७० किलोमीटरच्या परिघात होईल. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी एमएसपी व्यतिरिक्त पिकासाठी ३०० रुपये, गव्हासाठी ४०० रुपये देण्यात येईल. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्यात येईल'.

तेजस्वी यादव पुढे म्हणाले, 'आम्ही संपूर्ण बिहारमध्ये प्रचार करत आहोत. बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रचाराचा हा शेवटचा दिवस आहे. लोकांचा मूड हा बदल करण्याचा आहे. बिहारची जनता मागील २० वर्षांपासून सत्तेवर असलेल्या राज्यकर्त्यांना हटवतील. आम्ही जिंकत आहोत. बिहारची जनता आम्हाला जिंकवत आहेत. आम्ही १८ नोव्हेंबर रोजी शपथ घेणार आहोत'.

आरजेडीच्या मीसा भारती यांनी म्हटलं की, 'आम्हाला लोकांचं समर्थन मिळत आहे. तेजस्वी यांना बिहारच्या बेरोजगारांचंही समर्थन मिळत आहे. कारण ते त्यांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढत आहेत. ते युवक, महिला, महागाई आणि नोकरीवर बोलत आहेत. २००५ सालापासून डबल इंजिन सरकार आहे. त्यांच्यामुळे बिहारचे हाल झाले आहेत. या सरकारमुळे लोकांना रोजगाराची देखील सोय नाही. त्यामुळे दुसऱ्या राज्यात नोकरीसाठी जावं लागत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT