Eknath shinde And Devendra fadnavis Saam TV
देश विदेश

Maharashtra Politics : भाजपचं मिशन 45, मग शिंदे गटाचं काय?

भाजप शिंदे गटाला किती जागा सोडणार?

Shivaji Kale

Maharashtra Politics : लोकसभा नकवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रात मिशन ४५ चे टार्गेट ठेवले असले तरी भाजप शिंदे गटाला किती जागा सोडणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. शिवसेनेचे १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबर आहेत. तर भाजपचे नेते लोकसभा निवडणूक बाळासाहेबांची शिवसेच्यासोबत एकत्र लढणार असे सांगत असले तरी शिंदे गटाला किती जागा सोडणार हे मात्र अद्याप ठरलेले नाही आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिंदे यांच्या बरोबर १३ खासदार असले तरी त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असली तरी भाजपने तशी घोषणा केलेली नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या खासदारांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर युतीत लढून ४५ जागा जिंकण्याचे उदिष्ट ठेवले आहे. तर विधान सभेसाठी २०० हून अधिक जागा जिंकण्याचे उदिष्ट जाहीर केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सोमवारी महाराष्ट्रात चंद्रपूर आणि औरंगाबाद येथे आले होते. त्यांनी संघटनात्मक बैठका आणि सभाही घेतल्या.

२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रत्येक पक्षानं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभेसाठी भाजपने मिशन ४५ सुरु केलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला ४५ खासदार हवे आहेत आणि भाजप सध्या शिंदेसोबत सत्तेत आहे. त्यामुळे आता भाजप शिंदे गटाला किती जागा सोडणार याकडे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार राज्यात निवडून आले होते. त्यावेळी शिवसेनेने भाजपासोबत एकत्र निवडणूक लढवली होती. आता शिवसनेचे १३ खासदार हे शिंदे गटात सामील झाले आहेत. तर उद्धव ठाकरेंकडे फक्त पाच खासदार उरले आहेत. त्यात शिंदे गटाचे तेरा खासदार असलेल्या मतदारसंघात ही भाजपने मिशन ४५ सुरू केलं आहे. त्यामुळे आता शिंदेच्या खासदारांचं काय? अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT