Petrol Diesel Saam TV
देश विदेश

Petrol Diesel : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात मोठा बदल; झटपट चेक करा इंधनाचे दर

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

Petrol Diesel Latest Price : बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनेक ठिकाणी बदल दिसून येत आहेत. यूपी, बिहार आणि गुरुग्रामच्या राजधान्यांमध्ये आज इंधनाच्या दरात बदल करण्यात आला आहे.

जागतिक बाजारपेठेत पाहिले तर गेल्या २४ तासांत कच्च्या तेलाच्या किंमतीत सुमारे २ डॉलरची झेप घेतली आहे. असे असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात आज घसरण दिसून येत आहे.मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 10 पैशांनी स्वस्त म्हणजेच 96.47 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर डिझेल 10 पैशांनी घसरून 89.6 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये पेट्रोल (Petrol) 30 पैशांनी घसरून 107.24 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 28 पैशांनी स्वस्त होऊन 94.04 रुपये प्रति लीटरवर विकले जात आहे. हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये आज पेट्रोल 12 पैशांनी घसरून 96.77 रुपये प्रति लिटर, तर डिझेल (Diesel) 11 पैशांनी घसरून 89.65 रुपये प्रति लिटरवर पोहोचले.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT