देश विदेश

Supriya Sule : अमित शाह आणि मविआ खासदारांच्या बैठकीत काय झालं? सुप्रिया सुळेंनी दिली सविस्तर माहिती

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची दखलही गृहमंत्री यांनी घेतली.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्याकडे आम्ही वेळ मागितली होती आज त्यांनी आम्हाला भेट दिली. कर्नाटकचे मुख्यमंत्री जे वक्तव्य करत आहेत त्याबाबतची नोंद अमित शाह यांनी घेतली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची दखलही गृहमंत्री यांनी घेतली.  (Maharashtra News)

कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि राज्यातील वाचाळवीरांची माहिती आम्ही गृहमंत्री अमित शाह यांना दिली. काही प्रश्न असतात की ज्यामध्ये सर्वपक्षीय बैठकीची गरज असते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशावेळी एकत्र येत विरोधी पक्षाला विश्वासात घेत राज्याच्या हिताचे निर्णय घ्यायला हवेत, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं.

मात्र राज्याच्या मुख्यमंत्री वक्तव्य देखील उशीराने येत आहे. महाराष्ट्राचा अपमान होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान होत आहे, अशावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

गुजरातचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत लवकरात लवकर बैठक घेतली जाणार आहे. गृहमंत्री योग्य न्याय देतील, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

शांततेच्या मार्गाने सीमा प्रश्नाबाबतची कृती केली पाहिजे. प्रश्न सोडवला पाहिजे हा आमचा आग्रह आहे. दोन्ही राज्यांमध्ये या मुद्द्यावरुन हिंसा होऊ नये, असं आमचं मत असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्व पक्षीय बैठक बोलवावी, असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT