Tukaram Mundhe featured in New York Times Saam TV
देश विदेश

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Tukaram Mundhe featured in New York Times : महाराष्ट्र FDA आयुक्त IAS तुकाराम मुंढे यांच्या अन्नसुरक्षेच्या धडक मोहिमेची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. न्यू यॉर्क टाइम्सने त्यांना ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हटले.

Namdeo Kumbhar

Maharashtra FDA Chief Tukaram Mundhe : कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे IAS तुकाराम मुंढे यांच्या कामाची ख्याती आता थेट सातासमुद्रापार पोहोचली आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे सध्या सेवा बजावत आहेत. बीबीसी (BBC) न्यूज नंतर आता जगप्रसिद्ध वर्तमानपत्र 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची आणि कामाची विशेष बातमी छापून आली आहे.

मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर त्यांनी केलेल्या धडक कारवायांची दखल घेत अमेरिकन मीडियाने त्यांना 'रॉकस्टार' आणि खाद्यसुरक्षेचा नायक असे संबोधले आहे. तुकाराम मुंढेंच्या या जागतिक कौतुकामुळे महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांचीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईसह राज्यभरातील हॉटेल्स, अस्वच्छ स्वयंपाकघरे, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि नियम मोडणाऱ्या रेस्टॉरंट्सवर एफडीएने अचानक धाडी टाकून कडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत लहानांपासून ते अगदी नामांकित व १०० वर्षे जुन्या प्रसिद्ध उपाहारगृहांवरही नियमभंगाप्रकरणी तात्काळ टाळे ठोकण्यात आले आहे. न्यू यॉर्क टाइम्सने तुकाराम मुंढेंचा उल्लेख 'अन्नसुरक्षेचा रॉकस्टार' असा केला आहे. भारतासारख्या देशात नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ अन्न मिळावे यासाठी एका सनदी अधिकाऱ्याने सुरु केलेल्या या झिरो-टॉलरन्स धोरणामुळे प्रशासकीय व्यवस्थेत कसा मोठा बदल घडून येत आहे, यावर या आंतरराष्ट्रीय बातमीत प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.

न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीत काय आहे?

न्यूयॉर्क टाईम्सच्या "In India, a Food Safety Inspector Is a Rock Star" (भारतात एक अन्न सुरक्षा अधिकारी रॉकस्टार ठरतोय) या मथळ्याखाली छापून आलेल्या बातमीत तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. यात म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या FDA चे प्रमुख म्हणून मुंढे यांनी अस्वच्छ स्वयंपाकघरे आणि निष्काळजी अन्न उत्पादकांविरुद्ध शून्य-सहनशीलता (zero-tolerance) धोरण राबवले आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक त्यांना डोक्यावर घेत आहेत, तर रेस्टॉरंट मालकांमध्ये त्यांची भीती निर्माण झाली आहे. बातमीत मुंबईतील एका लोकप्रिय रेस्टॉरंटवरील सकाळी पडलेल्या धाडीचे वर्णन केले आहे.

जमिनीवर बसून आले कापले जात होते आणि कर्मचाऱ्यांकडे स्वच्छतेचे भान नव्हते. तसेच Matt Damon आणि Tom Holland सारख्या हॉलिवूड कलाकारांनी भेट दिलेल्या १०० वर्षे जुन्या 'Olympia Coffee House' वर आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून ते बंद करण्याचे आदेश कसे दिले गेले, याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. लहान रस्ते विक्रेत्यांपासून ते थेट मॅकडोनाल्ड्ससारख्या मोठ्या साखळी रेस्टॉरंट्सपर्यंत मुंढेंच्या आणि त्यांच्या टीमच्या धाडींचे सत्र पोहोचले असून, त्यांनी संपूर्ण भारताचे लक्ष वेधून घेतले आहे, असे या बातमीत स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

SCROLL FOR NEXT