Sangli News  Saam tv
देश विदेश

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

Sangli News : सांगलीच्या कृष्णा- वारणा नदी संगमावर एक असा मासा गळाला लागलाय ज्याची चर्चा महाराष्ट्रात सुरु आहे. नेमका हा मासा आहे तरी कसा ? चला पाहुया

Saam Tv

सांगलीच्या हरीपूर गावची माणसं मास धरायला नदीवर गेलती.. मासं घावून घावून किती घावायचं.. तर चार पाच माणसांच्या कालवणापुरतं.. पण इथ घावलाय एकच मासा असा गाव जेवील जसा... गळाला एक दोन नाय तर 40 किलोचा भला मोठा मासा घावलाय...

बघा हा व्हिडीओ... कृष्णा वारनेच्या संगमावर

वाघानं टाकला गळ... जर येळ वाट बघितली अन् गळला लागला हिसका... हिसका जरा जोराचाच होता...हाळू हाळू गळ वढला तसा गळाला लागला मोठा राकीस... असा तसा नाय तर चाळीस किलोचा कटला जातीचा ह्यो मासा पठ्ठ्याच्या गळाला लगला

जसा मासा जवळ आला तसा वाघानं थेट माशाच्या तोंटा हात टाकूनच उचलला... अन् काढला बाहेर.... ह्यो मोठा राकीस बघायला मोक्कार गर्दी... वजनात सांगायचं तर 40 किलो अन् अकारात सांगायचं तर चार फुटाचा ह्यो मासा...

नदीतनं ह्यो मासा थेट ताटात गेलाय... थोडक्यात काय. मासा 4 किलोचा असो नाय कर 40 किलोचा नदीत बाहेर आला का थेट ताटातच ....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT