Accident सोशल
देश विदेश

Accident : महाकुंभाला जाताना काळाचा घाला, बोलेरो ३० फूट दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

Mahakumbh Accident : महाकुंभाला जाणाऱ्या मित्रांच्या बोलेरे जिपचा भीषण अपघात झालाय. त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला, चार जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून याप्रकऱणाचा शोध घेतला जातोय.

Namdeo Kumbhar

Sidhi Road Mahakumbh Accident : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला जाताना भाविकांनी भरलेली बोलेरो गाडी ३० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे. बोलेरोमधून सर्व भाविक महकुंभात पवित्र स्नान करण्यासाठी निघाले होते, त्याचवेळी काळाने घाला घातला. सीधी जिल्ह्यात भीषण अपघात झालाय.

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बोलेरो बस ३० फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की बोलेरे बसच्या चेंदामेंदा झाला. अपघातामधील जखमींवर रीवा येथील संजय गांधी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत, तर चार जणांचा मृत्यू झालाय.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ जखमींना रूग्णालयात दाखल केले. मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून त्यांच्या अंदाजानुसार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बोलेरो दरीत कोसळली.

सुजीत यादव, प्रमोद यादव, संदीप साहू आणि रमाकांत साहू यांचा अपघात मृत्यू झाला. सर्वजण मित्र होते, अचानक त्यांनी महाकुंभला जाण्याची योजना आखली, पण तिथे जाण्याआधीच काळाने घाला घातला. चार मित्रांचा अपघाती मृत्यू झाला, तर चार जण जखमी आहेत. कृष्णा साहू, प्रदीप साहू यांच्यासह चार जण या अपघातात जखमी झाले आहेत.

महाकुंभासाठी अचानक प्लान केला

पोलिसांनी अपघाताची नोंद करत जखमींचा जबाब नोंदवला. जखमींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सर्वजण नातेवाईक अन् मित्र होते. त्यांचं वय २५ ते ३० वर्ष होते. प्रयागराजला पवित्र स्नान करण्यासाठी त्यांनी अचानक प्लॅन केला होता. पण रस्त्यातच काहींना मृत्यूने गाठले. जखमींवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP Protest: 'तुम्ही जनरेशन झेड नाहीत...', आशुतोष रांका आणि सौरव दासला हायकोर्टने फटकारले; सीजेपी नेत्यांनी घेतला मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये स्वामी समर्थ मंदिरात चोरी; दर्शन घेतल्यानंतर महिलेने चांदीच्या वस्तू लंपास केल्या

Jowar vs Bajra vs Ragi: ज्वारी, बाजरी की नाचणी? कोणत्या पिठात किती कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीन; जाणून घ्या फरक

Sprouted Potatoes: मोड आलेले बटाटे खायचे की नाही? आरोग्यावर काय होतो परिणाम, जाणून घ्या

Shocking : धक्कादायक! पोलिसाने राहत्या घरात आयुष्य संपवलं; अमरावतीत खळबळ

SCROLL FOR NEXT