former ias officer aditya vijay singh death  AI Image
देश विदेश

Death News : माजी निवडणूक आयुक्त आदित्य सिंह यांचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Madhya Pradesh Chief Secretary Aditya Vijay Singh Death : मध्य प्रदेशचे माजी मुख्य सचिव आणि माजी राज्य निवडणूक आयुक्त आदित्य विजय सिंह यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. आज भोपाळमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Alisha Khedekar

  • मध्य प्रदेशचे माजी मुख्य सचिव आदित्य विजय सिंह यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन

  • ते १९७० मधील मध्य प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी होते

  • मार्च २००२ ते जानेवारी २००४ या काळात त्यांनी मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळली

मध्य प्रदेशचे माजी मुख्य सचिव आणि माजी राज्य निवडणूक आयुक्त आदित्य विजय सिंह यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची दुःखद बातमी त्यांच्या मुलाने दिली असून त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे. आदित्य विजय सिंह यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

आदित्य विजय सिंह यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९४३ रोजी झाला होता. ते १९७० च्या तुकडीतील मध्य प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी होते. आपल्या कामातील शिस्त, स्पष्ट निर्णय आणि कडकपणामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. अनेक वर्षांच्या सेवेत त्यांनी राज्यातील विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले.

मार्च २००२ ते जानेवारी २००४ या काळात त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यावेळी राज्यात दिग्विजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होते. त्यानंतर डिसेंबर २००३ मध्ये उमा भारती यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर आले. या सत्ताबदलाच्या काळातही त्यांनी काही काळ मुख्य सचिव म्हणून काम केले. मुख्य सचिव होण्यापूर्वी त्यांनी ग्वाल्हेर आणि भोपाळसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम केले होते. तसेच केंद्र सरकारमध्ये असतानाही त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची मध्य प्रदेशच्या राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान काल त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा धनंजय विजय सिंह यांनी दिली. तसेच आज दुपारी ३ वाजता भोपाळमधील सुभाष नगर विश्राम घाट येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आदित्य विजय सिंह यांच्या निधनाने मध्य प्रदेशने अनुभवी आणि कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी गमावला आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS Captain: पंजाब किंग्जमध्ये एन्ट्री; हार्दिक पंड्यानेच सांगितला संघाचा कॅप्टन कोण? पोस्ट व्हायरल

Maharashtra News Live Update: पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची ई डी आणि सी बी आयकडून चौकशी होणार

Navi Mumbai: नाकाबंदीदरम्यान कारला अडवल्याचा राग, तरुणाने पोलिसाला २०० मीटरपर्यंत फरफटत नेलं; थरारक VIDEO

IPL 2027 आधी संघांमध्ये मोठी अदलाबदल; हार्दिक पंजाबकडून खेळणार, अर्शदीप मुंबईच्या ताफ्यात!

HDFC Bank चा ग्राहकांना झटका! MCLR मध्ये १५ बेसिस पॉइंट्सची वाढ; आता होम लोन महागणार?

SCROLL FOR NEXT