Mohan Yadav Government First Decision Saam Tv
देश विदेश

MP Government: मध्य प्रदेशातील मोहन सरकारचा पहिला आदेश, सर्व धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरवर बंदी

Mohan Yadav Government: मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे. मोहन सरकारने सर्व धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरचा आवाज निर्धारित डेसिबलपर्यंत मर्यादित करण्याचे आदेश दिले आहेत.

Satish Kengar

Mohan Yadav Government First Decision:

मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल मंगूभाई यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासह मध्य प्रदेशात मोहन सरकारची सुरुवात झाली आहे.

या सरकारने पहिला आदेशही जारी केला आहे. मोहन सरकारने सर्व धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरचा आवाज निर्धारित डेसिबलपर्यंत मर्यादित करण्याचे आदेश दिले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळे आणि इतर ठिकाणी अनियंत्रित लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. विहित डेसिबलचे उल्लंघन करून विविध धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर केला जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे, असे आदेशात लिहिले आहे. (Latest Marathi News)

आदेशात दिलेल्या सूचनांचं पालन न केल्यास सरकाराच्या वतीने कारवाई केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे. या आदेशात म्हटले आहे की, आवाजामुळे व्यक्तीच्या काम, विश्रांती, झोप आणि संवाद साधण्याच्या क्षमतेत व्यत्यय येतो. यामुळे अनेक आजारही होतात. यासंदर्भात एनजीटीच्या आदेशाचाही हवाला देण्यात आला आहे. लाऊडस्पीकरच्या आवाजाची तीव्रता क्रमाने ठरवण्यात आली आहे.

या आदेशानुसार, औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 आणि रात्री 70 डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा 55 आणि दिवसा 55 डेसिबल राहील. रात्री 45 आणि सायलेन्स झोनमध्ये दिवसा 50 आणि रात्री 40 डेसिबल असेल. अशी आवाजाची मर्यादा ठरवण्यात आली आहे.

दिलेल्या आदेशाचं पालन होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी सरकारने एक पथकही तयार केलं आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनाने नामनिर्देशित केलेले अधिकारी, संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी आणि प्रादेशिक अधिकारी किंवा प्रदूषण मंडळाचे अधिकारी असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT