Medical Test Before Drinking Alcohol? Government's New Health Service Explained 
देश विदेश

दारूड्यांसाठी सरकारची अनोखी योजना; दारू पिण्याआधी होणार मेडिकल टेस्ट

Doctors at Liquor Outlets : तुम्ही दारू पीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता तुम्ही दारू पिण्यासाठी जात असाल तर तुमही त्याच ठिकाणी मेडिकल चाचणी केली जाणार आहे. दारूच्या गुत्त्यावर सरकारी डॉक्टर का ठेवले आहेत? सरकारनं हा निर्णय़ का घेतलाय? पाहूयात हा रिपोर्ट.

Vinod Patil

  • मद्यपान करणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा उपक्रमाचा उद्देश.

  • दारूच्या गुत्त्यावर सरकारी डॉक्टर का ठेवले जाणार, याबाबत उत्सुकता.

  • वैद्यकीय तपासणीमध्ये कोणत्या चाचण्या केल्या जाणार?

देशी दारूमुळे कुणाचा बळी गेला तर सरकार काय करतं हे तुम्हाला चांगलं माहितीय. सरकार थेट त्या परिसरातल्या दुकानांना सील ठोकतं आणि दारू विक्रीवर बंदी घालत असणार. हे झालं आपल्या महाराष्ट्रातलं, मात्र मध्य प्रदेशात यासाठी आगळा वेगळा नियम आहे. तो तुम्ही पाहिला तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात देशी दारू पिऊन तीस पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे मध्य प्रदेशातल्या कायदा सुव्यवस्थेवर देशभरातून टीकेची झोड उठली. राज्य सरकारनं याची गंभीर दखल घेतली. थेट सरकारी डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांनाच दारूड्यांच्या दिमतीला ठेवलं. दारूच्या दुकानांसमोर मेडिकल कॅम्प लावण्यात आले आहेत. दारू पिण्यासाठी येण्याऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या रक्ताचे नमुके घेऊन त्याची टेस्ट करण्यात येते. या टेस्टचे रिपोर्ट योग्य आले.

म्हणजे काय तर. त्यांचं लिव्हर आणि किडनी दारू रिचवण्यासाठी योग्य असेल तरच त्यांना दारू विकत घेण्याची आणि पिण्याची परवानगी दिली जाते. एवढंच नव्हे तर प्रत्येक दारू पिणाऱ्या ग्राहकाची नोंद ठेवण्यासाठी डॉक्टरांसोबत पोलीस अधिकाऱ्यांचीही ड्युटी लावण्यात आलीय. आहे की नाही मध्य प्रदेश सरकारची गंमत, यालाच म्हणतात रोगापेक्षा इजाल भयंकर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: क्रिकेटचं ऐतिहासिक 'वैभव' परतलं; वैभव सूर्यवंशीच्या 52 चेंडूत 204 धावा

Thursday Horoscope: आज 3 राशींच्या आयुष्यात घडणार आनंददायी बदल, तर काहींना कामाच्या ठिकाणी नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार

हृदयविकार, BP, डाय़बेटीजची बनावट औषधं; FDA कडून बनावट कारखान्याचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: मुंबईतील माहीम परिसरातील ज्वेलर्स दुकानावरती अज्ञातांकडून गोळीबार

Fact Check: खासगी रुग्णालयात आयुष्मान कार्ड बंद? मोफत उपचार मिळणार नाही?

SCROLL FOR NEXT