MADHYA PRADESH FARMERS PROTEST FOR 100% MOONG MSP PROCUREMENT | BHOPAL FARMERS AGITATION Saam tv
देश विदेश

Farmers Protest : मुगाला १०० टक्के हमीभाव, हजारो शेतकरी आक्रमक; ७ दिवसांचं अन्न-पाणी घेऊन ठिय्या, शाळांना सुट्टी

Madhya Pradesh Farmers Protest : मध्य प्रदेशात मुगाला १०० टक्के हमीभावाने खरेदी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. भोपाळमध्ये शेतकरी ठिय्या आंदोलन करत असून, सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Alisha Khedekar

  • मध्य प्रदेशातील मूगाला १०० टक्के हमीभावाने खरेदी मिळावी या मागणीसाठी शेतकरी भोपाळमध्ये आंदोलन करत आहेत

  • संयुक्त किसान मोर्चासह १९ शेतकरी संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे

  • राज्य सरकारने केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मूग खरेदी वाढवण्याची मागणी केली आहे

दिल्लीत एकीकडे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश येत होत तर, दुसरीकडे शेतकऱ्यांचं वादळ त्यांच्या काही प्रमुख मागण्यांसाठी संसदेवर येऊन धडकले. अशातच आता मध्य प्रदेशात मुगाला १०० टक्के हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. हे आंदोलन आता तीव्र झाले आहे. मंगळवारी अनेक शेतकरी धान्याची पोती, अंथरूण-पांघरूण, स्वयंपाकाची भांडी आणि आठवडाभराचा राशन घेऊन भोपाळच्या बाहेरील भागात दाखल झाले. सावरकर सेतू परिसरात त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून, आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश सरकारनेही या प्रश्नात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. राज्याचे कृषी मंत्री ऐदलसिंह कंसाना यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांना पत्र पाठवून मूग खरेदी वाढवण्याची विनंती केली आहे. १४ मे ते ३ जुलै २०२६ या कालावधीत राज्यात सुमारे ८.०६ लाख मेट्रिक टन मूग उत्पादन झाले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी हमीभावाचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली १९ शेतकरी संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सरकारने मूगाची १०० टक्के खरेदी करावी तसेच खत वितरणाशी संबंधित अडचणी दूर कराव्यात, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. शेतकरी मुख्यमंत्री निवासाकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत असून, परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, तूर, उडीद आणि मसूर पिकांसाठी १०० टक्के एमएसपी खरेदीची तरतूद असताना मूगासाठी ती लागू नाही. त्यामुळे अनेकांना खुल्या बाजारात कमी दराने पीक विकावे लागत आहे. वाढता उत्पादन खर्च, खरेदीतील विलंब आणि नोंदणीतील अडचणी यामुळे ग्रामीण भागात नाराजी वाढत असून, सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT