Ujjain Crime News Saam Tv
देश विदेश

MP News: बायको, मुलांना दिलं विष; नंतर स्वतः फास घेत संपवलं जीवन; का उचललं इतकं टोकाचं पाऊल?

Ujjain Crime News: बायको, मुलांना दिलं विष; नंतर स्वतः फास घेत संपवलं जीवन; का उचललं इतकं टोकाचं पाऊल?

Satish Kengar

Ujjain Crime News:

मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील चार लोकांनी आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उज्जैन पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील जिवाजी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महावीर कॉलनी येथे ही घटना घडली आहे. मनोज राठोड (४०), त्यांची पत्नी ममता राठोड (१२), त्यांचा १२ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी अशी मृत कुटुंबीयांची नावे आहेत.

पोलीस अधिकारी सुमित अग्रवाल 'एएनआय'ला सांगितले की, "जिल्ह्यातील जिवाजी पोलिस स्टेशन अंतर्गत महावीर कॉलनीतील एका घरात चार मृतदेह आढळल्याची माहिती आम्हाला रात्री 12 वाजता मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि घरात मृतदेह सापडले."  (Latest Marathi News)

मृत मनोज हा लटकलेल्या अवस्थेत सापडला, तर त्याची पत्नी आणि दोन मुले जमिनीवर पडले होते. काही मृतदेहांच्या नाकातून फेसही आला होता, मात्र शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज येथे भाड्याच्या घरात राहत होता आणि खेळणी विक्रीचा व्यवसाय करत होता. त्यानेच आपल्या मुलांना आणि पत्नीला विष दिलं. यानंतर त्याने स्वतः फास घेऊन जीवन संपवलं, असं सांगण्यात येत आहे. त्याने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT