Indore Saam
देश विदेश

Shocking: हायवेवरच कार थांबवून महिलेशी शरीरसंबंध, व्हिडिओ झाला लीक; आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित

Private act with woman video leaked: दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप इंदूर येथील मनोहरलाल धाकड या एका राजकीय पक्षाशी संबंधित नेत्यावर आहे.

Bhagyashree Kamble

मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका राजकीय पक्षाशी संबंधित नेत्याचा दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ लीक झाला आहे. मनोहरलाल धाकड असे नेत्याचे नाव असून, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक कार रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसत आहे. कारमधून एक पुरूष आणि महिला दोघेही बाहेर येतात. तसेच कारच्या बाजूलाच ते दोघे शारीरिक संबंध ठेवत असल्याचे त्या व्हिडिओत दिसते.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारचा नंबरही स्पष्टपणे दिसत आहे. परिवहन विभागाच्या नोंदीनुसार, ही कार मनोहरलाल धाकड यांच्या नावावर नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली आहे.

सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून, भानपुरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४ (अश्लील कृत्य), २८३ (सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणे), २८५, २९६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओनुसार, ही घटना १३ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजून २६ वाजता घडली आहे.

मनोहरलाल धाकड हे उज्जैनमधील धाकड महासभेचे राष्ट्रीय मंत्री होते, मात्र या घटनेनंतर महासभेने त्यांना पदावरून हटवल्याचे अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, व्हायरल व्हिडिओमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

SCROLL FOR NEXT