Madhya Pradesh - Chhattisgarh Election News Saam Tv
देश विदेश

National Political News: मध्य प्रदेश - छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून यादी जाहीर, पहिल्या यादीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची नावे नाहीत

Madhya Pradesh - Chhattisgarh News: मध्य प्रदेश - छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून यादी जाहीर, पहिल्या यादीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची नावे नाहीत

Satish Kengar

Madhya Pradesh - Chhattisgarh Election News: मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारीला वेग दिला असून उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. भाजपने मध्य प्रदेशमध्ये 39 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय छत्तीसगडमधील 21 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मध्य प्रदेशात भाजपने ज्या ३९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, त्यापैकी तीन महिला आहेत. पहिल्या यादीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव नाही. ते सीहोर जिल्ह्यातील बुधनी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

सतना जिल्ह्यातील चित्रकूट मतदारसंघातून भाजपने सुरेंद्र सिंह गहरवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. याशिवाय छतरपूर मतदारसंघातून भाजपने ललिता यादव यांना उमेदवारी दिली आहे. सुमावलीमधून अदल सिंग कंसाना आणि पिचोरमधून प्रीतम सिंग लोधी यांना संधी मिळाली. प्रीतम सिंह लोधी हे ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांच्या जवळचे मानले जातात. गोहड राखीव जागेवरून लालसिंग आर्य, चाचोडा येथून प्रियंका मीना यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

छत्तीसगडमधील २१ पैकी ५ महिला उमेदवार

छत्तीसगडबद्दल बोलायचे झाले तर, तेथे भाजपने २१ पैकी ५ महिलांना उमेदवारी दिली आहे. येथे भाजपने बस्तर या आदिवासी राखीव जागेवरून मणिराम कश्यप यांना तिकीट दिले आहे. सेफ सीट मोहला मानपूर येथून संजीव साहा यांना संधी मिळाली आहे.

याशिवाय अभानपूरमधून इंद्रकुमार साहू, खैरागडमधून विक्रांत सिंह, कांकेरमधून आशाराम नेता यांना तिकीट देण्यात आले आहे. रामविचार नेताम यांना रामानुजगंजमधून तर शकुंतला सिंग पोर्थे यांना प्रतापपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रेम नगरमधून भुलनसिंग मरावी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. छत्तीसगडमधूनही माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही.

दरम्यान, भाजपने बुधवारीच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसंदर्भात निवडणूक समितीची बैठक बोलावली होती. यात राज्याचे प्रभारी, गृहमंत्री अमित शाह , भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटन सरचिटणीस बीएल संतोषही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. त्यानंतर आज पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT