मध्य प्रदेश सरकारने तीन जिल्ह्यांच्या जिल्हयाधिकाऱ्यांसह पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तसेच चार IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करणीय आले आहेत. सागर जिल्हयात विषारी दारुमुळे 13 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राज्य सरकारने जिल्हाधिकारी आणि पोलीस आधीक्षकांची बदली केली आहे. सागरच्या जिल्हाधिकारी प्रतिभा पाल यांना पदावरून हटवून मध्य प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे.
सागरचे जिल्हाधिकारी म्हणून दिलीप कुमार यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंदूरमधील दूषित पाण्याच्या प्रकरणानंतर त्यांना इंदूर महापालिका आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याकडे मध्य प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता त्यांची सागरच्या जिल्हाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रतिभा पाल यांची पर्यटन महामंडळात नियुक्ती
2012 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी प्रतिभा पाल यांना सागरच्या जिल्हाधिकारीपदावरून हटवून मध्य प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. 10 एप्रिल 2026 रोजी त्यांची सागरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती. या पदावर त्यांचा कार्यकाळ सुमारे सात महिन्यांचा राहिला.
दिलीप कुमार यादव सागरचे नवे जिल्हाधिकारी
2014 च्या बॅचचे आयएएस अधिकारी दिलीप कुमार यादव यांच्याकडे सागरच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याआधी ते मध्य प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. इंदूरमधील दूषित पाण्याच्या प्रकरणानंतर त्यांना इंदूर महापालिका आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते.
सिवनी आणि देवासच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याही बदल्या
सिवनीच्या जिल्हाधिकारी नेहा मीना यांची देवासच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या 2014 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. देवासचे जिल्हाधिकारी ऋतुराज यांना मंत्रालयात पाठवण्यात आले असून, त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. दरम्यान, पंचायत आणि ग्रामीण विकास विभागाच्या उपसचिव अंजू अरुण कुमार यांची सिवनीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सागरमधील विषारी दारूकांडानंतर चर्चेत आलेले 2014 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अनुराग सुजानिया यांना सागरच्या पोलीस अधीक्षकपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांची पोलीस मुख्यालय, भोपाळ येथे सहायक पोलीस महानिरीक्षक (AIG) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2016 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजीव कुमार सिन्हा यांची सागरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते ग्वाल्हेर येथील विशेष सशस्त्र दलाच्या (SAF) 14 व्या बटालियनमध्ये कार्यरत होते. देवासचे पोलीस अधीक्षक पुनीत गेहलोत यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांना पोलीस मुख्यालय, भोपाळ येथे सहायक पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
तर बालाघाटचे पोलीस अधीक्षक आदित्य मिश्रा यांच्याकडे देवासच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सागरमधील विषारी दारूकांड आणि इंदूरमधील दूषित पाण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेत महत्त्वाचे फेरबदल केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.