Crime News Saam TV
देश विदेश

Crime News : फाटलेली नोट दिल्याने ग्राहक संतापला; अंगावर पेट्रोल ओतून दुकानदाराला पेटवलं

१० रुपयांची फाटलेली नोट सुट्ट्या पैशांमध्ये मिळाली.

साम टिव्ही ब्युरो

Ludhiana Crime : लुधियानाच्या हैबोवाल भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. १० रुपयांच्या नोटेवरून ३६ वर्षीय दुकानदाराला चक्क पेटवून देण्यात आलं आहे. सदर घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.(Petrol)

मिळालेल्या माहितीनुसार, शेखर असं मृत व्यक्तीचं असून त्याचं भाजीचं दुकान होतं. आरोपी रवीने बुधवारी रात्री शेखरच्या दुकानातून भाजी विकत घेतली. त्यावेळी त्याला १० रुपयांची फाटलेली नोट सुट्ट्या पैशांमध्ये मिळाली.

यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. रवीने यावेळी संताप व्यक्त करत शेखरवर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. यामुळे शेखरच्या डोक्याला, पाठीला आणि खांद्याला यामुळे भाजलं आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीने बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास शेखरकडून २० रुपयांचा मुळा विकत घेतला. यावेळी त्याने शेखरला ५० रुपयांची नोट दिली. उर्वरीत ३० रुपये परत देताना शेखरकडून एक फाटलेली नोट गेली.

त्यामुळे रवीने ती नोट शेखरच्या अंगावर फेकली. याचा शेखरला राग आला. त्यावरुन दोघांमध्ये शिवीगाळ झाली. राग अनावर झाल्याने रवीने पुढे शेखरच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके पुन्हा दिल्लीमधील आंदोलनात सहभागी होणार

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

SCROLL FOR NEXT