Crime News  Saam Tv
देश विदेश

Crime: बॉयफ्रेंड की मित्र? गर्लफ्रेंड रात्री कुणासोबत थांबणार? वाद टोकाला गेला अन्..मध्यरात्री नको ते घडलं

Tragic End Youth Hangs Himself: अमन येथील प्रियकराने प्रेमविवादामुळे आत्महत्या केली. त्याच्या प्रेयसी आणि मित्राला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

रात्रीच्यावेळी तरूणीला नेमकं ठेवायचं कुठे, या कारणावरून प्रियकर, त्याचा मित्र आणि प्रेयसीमध्ये वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की, प्रियकराने शेतातील झाडावर गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसी आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे. ही धक्कादायक घटना मथुरा येथील बरसाना पोलीस ठाणे हद्दीत घडली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मृत व्यक्तीचं नाव अमन असून, तो हरियाणातील तावडू- नूंहचा रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनचे एका तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. अमन आणि त्याचा मित्र मोटारसायकलवरून आले आणि प्रेयसीला देखील गावाबाहेर घेऊन गेले. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटारसायकल बंद पडली. तरूणीला नेमकं कुठे ठेवायचं? कुठे घेऊन जायचं? या प्रश्नावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.

वाद टोकाला गेला. अमनला राग अनावर झाला. तो थेट तेथून निघून गेला. त्यानंतर अमन शेतात गेला आणि झाडाला गळफास बांधून आत्महत्या केली. त्यानंतर प्रेयसी आणि त्याचा मित्र फरार झाले. २ दिवसानंतर बरसना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाजीपूर आणि संकेत गावादरम्यान, अमनचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.

अमनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी अमनच्या प्रेयसीला आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांकडून दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे. या घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: कधीच वेगळा गट केला नाही,साहेबांचा निर्णय मान्य केला; राजीनामा देताना जयंत पाटील भावुक

Sanjay Dutt: संजय दत्त लवकरच या ५ चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ

Maharashtra Politics: फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार; कुणाला डच्चू, कुणाला संधी?VIDEO

Chapati Nachos : चपातीपासून घरीच करा कुरकुरीत नाचोस, नाश्त्यासाठी ५ मिनिटांत बनवा रेसिपी

Maharashtra Tourism: महाराष्ट्रातील स्वित्झर्लंड! शांत वातावरण अन् सुंदर निसर्ग,'या' ठिकाणी एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT