Crime  Saam tv
देश विदेश

Crime News: प्रायव्हेट पार्ट अन् शरीरावर स्क्रू ड्रायव्हरने वार, बॉयफ्रेंडनं शेतात बोलावून गर्लफ्रेंडला संपवलं

Shock in Mainather: मैनाथर भागात एका धक्कादायक घटनेत, प्रियकराने क्षुल्लक वादातून आपल्या प्रेयसीची स्क्रू ड्रायव्हर आणि धारदार शस्त्राने हत्या केली.

Bhagyashree Kamble

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून प्रियकराने आपल्या प्रेयसीची स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून हत्या केली आहे. आधी प्रेयसीला जंगलात बोलावून घेतलं नंतर तिच्यावर स्क्रू ड्रायव्हर आणि धारदार शस्त्राने वार करत हल्ला केला. ती रक्तबंबाळ होऊन शेतातच पडून होती. रूग्णलयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील मैनाथर भागात घडली असून, या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

सायरा (वय वर्ष २०) असे मृत मुलीचे नाव आहे. तर, जब्बार असे आरोपीचे नाव आहे. दोघांचे प्रेमसंबंध होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद सुरू होता. यानंतर प्रेयसीने काही साथीदारांच्या मदतीने प्रियकराला तुडवलं. यानंतर प्रियकराला संताप अनावर झाला. त्याने शनिवारी प्रेयसीची हत्या करायचं ठरवलं. आरोपीने आधी प्रेयसीला शेतात बोलावून घेतलं. नंतर तिच्यावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला.

तसेच इतर शस्त्रांचा वापर करूनही हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर सायराचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या सायराच्या कुटुंबाने रात्रभर तिचा शोध घेतला, मात्र ती काही सापडली नाही. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेतात सायराच्या आईला सायराचा मृतदेह शेतात सापडला. सायराचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत होता. तसेच शरीरावर ३० हून अधिक वार होते.

सायराचा मृतदेह घेऊन रूग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात सायराचा मृत्यू अंतर्गत रक्तस्त्रावामुळे झाला असल्याचं रिपोर्टमधून उघड झालं. एसपी कुंवर आकाश सिंह यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणानंतर सायराच्या कुटुंबाने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी तपास केला आणि आरोपीला अटक केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT