Love Affair Turns Fatal Saam
देश विदेश

डॉक्टरचं नर्ससोबत अनैतिक संबंध, भुलीचं इंजेक्शन दिलं, विवस्त्र करून रस्त्यावर फेकलं अन् कारनं चिरडलं

Love Affair Turns Fatal: अवैध संबंध लपवण्यासाठी डॉक्टरनं नर्सला संपवलं. भुलीचं इंजेक्शन देऊन कारखाली चिरडलं.

Bhagyashree Kamble

  • डॉक्टरनं नर्सला संपवलं.

  • भूल देऊन कारखाली चिरडलं.

  • अवैध संबंध लपवण्यासाठी डॉक्टरनं रचला कट.

उत्तर प्रदेशातील बरेली येखून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अवैध संबंध लपवण्यासाठी त्यानं माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यानं नर्सला भूल देण्याचं इंजेक्शन दिले आणि नंतर तिला गाडीनं चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत.

ही घटना १६ सप्टेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे. २२ वर्षीय महिला बिथरी चैनपूर बायपासवर नग्न आणि जखमी अवस्थेत आढळली. रूग्णालयात उपचार घेत असताना तिनं संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली.

बरेलीचे पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी डॉक्टरच्या रूग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती. दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. डॉक्टरनं महिलेला तिच्या कुटुंबापासून दूर केले. डॉक्टर आरोपी हा विवाहित होता. त्याच्या बायकोला अनैतिक संबंधाबाबत माहिती मिळाली. दोघांमध्ये रोज भांडणे होत.

दरम्यान, नर्स महिला त्याच्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. डॉक्टरनं कोर्ट मॅरेजचं आश्वासन दिलं. नर्सकडून दबाव वाढल्यानंतर त्यानं नर्सला संपवण्याचा कट रचला. त्यानं पोटदुखीचं नाटक करून नर्सला कारमधून नेलं. त्यानं महिलेला भूल देण्याचं इंजेक्शन दिलं. नंतर तिचे कपडे काढून रस्त्यावर फेकून दिलं. तसेच तिच्या अंगावरून कार घातली. अज्ञात व्यक्तीनं महिलेला रूग्णालयात नेलं. उपचार सुरू असताना तिनं पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी माहितीच्या आधारे आरोपी डॉक्टरला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी मोठी अपडेट; हगवणे कुटुंबांतील सदस्यांचा जामीन फेटाळला

Crime : कौटुंबिक वाद टोकाला पोहोचला, सावत्र मुलीसमोर नवऱ्याचं बायकोसोबत भयंकर कृत्य; बस स्टँडवर काय घडलं?

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंचं ठरलं! दिवाळीत युती; दोन फॉर्म्युल्यावर चर्चा, कोणत्या भावाला किती जागा मिळणार?

Chanakya Niti: आयुष्यभर तुमच्यावर पडेल पैशाचा पाऊस, फक्त या ७ गोष्टी फॉलो करा! चाणक्य निती काय सांगते?

Chameleon: सरडा एका दिवसात किती वेळा रंग बदलतो?

SCROLL FOR NEXT