air india  Saam tv
देश विदेश

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

UK Air Traffic Control Failure : लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील विमानसेवा एअर ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणेतील बिघाडामुळे विस्कळीत झाली. एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील OSD आणि फोटोग्राफरसह ६ अधिकाऱ्यांचे विमान झ्युरिकला डायव्हर्ट झाल्याची माहिती आहे.

Namdeo Kumbhar

सूरज मसूरकर, साम टीव्ही प्रतिनिधी

Eknath Shinde officials stranded in Zurich : लंडन येथील प्रसिद्ध हिथ्रो विमानतळावर (Heathrow Airport) अचानक झालेल्या एका मोठ्या सायबर हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा मोठा बोजवारा उडाला आहे. या सायबर हल्ल्यामुळे सर्वच विमानांची उड्डाणे सुमारे १० ते १२ तास उशिराने सुरू आहेत. या तांत्रिक गोंधळाचा थेट फटका एका पुरस्कार सोहळ्यासाठी लंडनला गेलेल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना बसला आहे.

ब्रिटनमध्ये एअर ट्रॅफिक सिस्टीम फेल झाल्यानं उड्डाणे १० ते १२ तास उशिरानं सुरू आहेत. याचा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना बसला आहे. एकनाथ शिंदेंचे OSD आणि फोटोग्राफर यांची फ्लाईट डायव्हर्ट झाली आहे. पुरस्कार सोहळ्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांचे विमान हिथ्रोऐवजी झुरिककडे डायव्हर्ट करण्यात आल्याने ६ अधिकारी झ्युरिकामध्येच अडकल्याची माहिती मिळाली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ब्रिटिश एयरवेजचा विमानात असून त्यांची फ्लाईट वेळेत असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी (OSD) आणि फोटोग्राफर यांच्यासह एकूण ६ अधिकाऱ्यांच्या विमानाचे लँडिंग हिथ्रो विमानतळावर होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांचे विमान तातडीने स्वित्झर्लंडमधील झ्युरिक (Zurich) येथे डायव्हर्ट करण्यात आले. परिणामी उपमुख्यमंत्र्यांचे सर्व सहा अधिकारी सध्या झ्युरिकमध्येच अडकून पडले आहेत. लंडनमध्ये सध्या सकाळचे साडेपाच वाजले असून, तेथील स्थानिक प्रशासनाकडून या सर्व अधिकाऱ्यांना पहाटे सातच्या सुमारास लंडनला आणण्याची विशेष सोय केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे विमानसेवेचा मोठा बोजवारा उडाला

युके (UK) मधील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) यंत्रणेत अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विमानसेवेचा मोठा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे ब्रिटनसह जगभरातील हवाई वाहतुकीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. 'NATS' या ब्रिटनच्या मुख्य एअर ट्रॅफिक कंट्रोल संस्थेच्या सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने युकेमधील १५ हून अधिक प्रमुख विमानतळांवर विमानांची उड्डाणे ठप्प झाली आहेत. यामुळे आतापर्यंत १,००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली असून हजारो प्रवासी विविध विमानतळांवर ताटकळत अडकून पडले आहेत. या अभूतपूर्व गोंधळामुळे आणि प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल NATS प्रशासनाने अधिकृतपणे माफी मागितली असून, परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आणि तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT