Loksabha Election Saam Tv
देश विदेश

Loksabha Election: लोकसभा निवडणुका मार्चआधीच जाहीर होणार? कोणते संकेत आणि चर्चा नेमकी कशामुळे?

Loksabha Election: निवडणूक आयोगाने यासंदर्भात राज्य सरकारला पत्र पाठवलंय. यामुळे देशात मार्चआधीच निवडणुकांचा कार्यक्रम लागू केला जाण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

Loksabha Election:

देशात लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चआधीच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. अनेक पक्षांनी आपल्या निवडणुकीच्या तयारी सुरू केलीय. भाजप आणि इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बैठकांचं सत्र सत्र सुरू झालंय. (Latest News)

त्यातच ३१ जानेवारीपर्यंत निवडणूक संदर्भातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या पूर्ण करण्याच्या सुचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने यासंदर्भात राज्य सरकारला पत्र पाठवलंय. यामुळे देशात मार्चआधीच निवडणुकांचा कार्यक्रम लागू केला जाण्याची शक्यता आहे.

निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ नये यासाठी ३१ जानेवारीपर्यंत सर्व बदल्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. लोकसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे मार्च महिन्याच्या आधीच निवडणुका जाहीर होतात का? या संदर्भात चर्चा सुरू आहे. निवडणुका लवकर लागणार असल्याने भाजपसह काँग्रेस आणि इतर पक्ष कामाला लागले आहेत. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर बैठकांचा धडका लावलाय.

देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये आलीय. निवडणुकांच्या पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी निवडणूक आयोग राज्यांच्या दौऱ्याना प्रारंभ केलाय. आयोग सर्व प्रथम आंध्र प्रदेश व तामिळनाडूचा दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगितलं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: ३ सख्ख्या बहिणींच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, 'ती' डायरी सापडली; शेवटच्या पानातून सत्य उघड

Mumbai Mayor Election: मुंबईत शिंदेंची गोची होणार? भाजपचा महत्त्वाच्या ३ पदावर दावा

Crime News : कुजलेला चेहरा अन् अर्धवट पुरलेला मृतदेह, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला पोलिसांनी केली अटक, नेमकं झालं काय?

Maharashtra Live News Update: पवार कुटुंब आज पुन्हा एकत्र

Local Train Accident: धक्कादायक, मुंबई लोकलमध्ये दररोज १३ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT