Lok Sabha Speaker Election  Saam Tv
देश विदेश

Lok Sabha Speaker: इतिहासात पहिल्यांदा लोकसभा अध्यक्षपदासाठी होणार निवडणूक, उमेदवार कोण असणार?

Om Birla Vs K Suresh: स्वातंत्र्यानंतर इतिहासामध्ये पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदााठी निवडणूक होणार आहे. लोकसभा अध्यक्षपदावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे.

Priya More

लोकसभा अध्यक्ष (Loksabha Speaker) पदाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशामध्ये आता लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. स्वातंत्र्यानंतर इतिहासामध्ये पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदााठी निवडणूक होणार आहे. लोकसभा अध्यक्षपदावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळेच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

लोकसभा अध्यक्षपदावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. कारण एनडीए आणि इंडिया आघाडी या दोन्ही पक्षांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ओम बिर्ला यांचे नाव भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने निश्चित केले आहे. ओम बिर्ला यांनी आज लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे, इंडिया आघाडीकडून के सुरेश यांचे नाव निश्चित करण्यात आले. काँग्रेसचे खासदार के सुरेश यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला.

लोकसभा अध्यक्षपदाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा झाली होती. पण लवकरच विरोधकांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधी पक्ष उपाध्यक्षपदावर दावा करत असल्याने वाद आणखीनच चिघळला. यासाठी सत्ताधारी पक्षाकडून पाठिंबा मिळाला नाही. यानंतर विरोधकांनी निवडणुकीचा निर्णय घेतला. काँग्रेसचे केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, 'विरोधकांचा जर उपाध्यक्ष नसेल तर पाठिंबा देण्याऐवजी आम्ही अध्यक्षपदासाठी आमचाच उमेदवार उभा करू. अशा स्थितीत विरोधी पक्षाकडून के सुरेश यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले. '

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT