Rahul Gandhi and Pm Modi Saam Tv
देश विदेश

NEET च्या मुद्द्यावर चर्चा झालीच पाहिजे, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र

Rahul Gandhi Writes To Pm Modi: लोकसबाह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी संसदेत नीटच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची विनंती केली आहे.

Satish Kengar

संसदेत मंगळवारच्या दिवसाची सुरुवातही गदारोळात झाली. याचदरम्यान, काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बुधवारी नीट मुद्द्यावर संसदेत चर्चेची विनंती केली आहे. याआधी सोमवारी राहुल गांधी यांनी नीटसह अनेक मुद्द्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

याशिवाय राज्यसभेत अनेक विरोधी पक्षांनी देशातील विविध परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्याची वाढती प्रकरणे, राज्यांशी भेदभाव आणि केंद्रीय यंत्रणांना दुरुपयोग विरोधी पक्षनेत्यांना त्रास देण्यासाठी करणे, असे आरोपही केले होते.

याआधी सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. नीट परीक्षेच्या पेपरफुटीवरून राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला होता. नीट परीक्षा आता व्यावसायिक परीक्षा झाली आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

कडक कायदे असतानाही पेपरफुटी हे दुर्दैवीच नाही तर लाखो मुलांच्या भवितव्याशी खेळ आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अनेक वर्षांपासून पेपरची तयारी केली आहे, त्यांच्यासाठी अशी घटना अत्यंत वाईट आहे. या घटनेवरून सरकारचे अपयश दिसून येते, असं राहुल गांधी म्हणाले होते.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी मंगळवारी NEET-UG मधील कथित अनियमिततेबद्दल केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली होती. वैद्यकीय प्रवेश परीक्षेत बसलेल्या सर्व 24 लाख उमेदवारांसाठी परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earrings Designs: साडीपासून ते लेहेंग्यापर्यंत...; या कानातल्यांच्या डिझाईन्स आहेत कोणत्याही आऊटफिटसाठी परफेक्ट चॉइस

Raj Thackeray: किल्ल्यांवरील नमो केंद्र फोडून काढू; राज ठाकरेंचा सरकारला गंभीर इशारा

Maharashtra Live News Update: रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे?

Raj Thackeray: सुट्टी दिली नाही तर बॉसच्या कानाखाली मारा; राज ठाकरे असं का म्हणाले? VIDEO

Ind vs Aus Semi Final: ऑस्ट्रेलियाचा तडाखा, ३३९ धावांचं टार्गेट; भारत फायनल गाठणार का?

SCROLL FOR NEXT