लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 43 नावे आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, आम्ही पहिली यादी जाहीर केली आहे. आता आम्ही दुसरी यादी प्रसिद्ध करत आहोत. काल पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर ही यादी निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यात आसाम, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची नावे आहेत.
दुसऱ्या यादीत गौरव गोगोई यांना आसामच्या जोरहाटमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच नकुल नाथ यांना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून तिकीट देण्यात आले आहे. राजस्थानच्या चुरूमधून राहुल कासवान आणि जालोरमधून वैभव गेहलोत यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने राहुल कासवान यांचे तिकीट कापले होते. यानंतर त्यांनी बंडखोरी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, या यादीतील 43 उमेदवारांपैकी 10 जनरल उमेदवार, 13 ओबीसी उमेदवार, 10 एससी उमेदवार, 9 एसटी उमेदवार आणि 1 मुस्लिम उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने (CEC) सोमवारी राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी 60 हून अधिक उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली, त्यापैकी सुमारे 43 उमेदवारांना मंजुरी देण्यात आली. (Latest Marathi News)
काँग्रेसने मागली आठवड्यात शुक्रवारी 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये राहुल गांधी यांचे सर्वात प्रमुख नाव होते. केरळमधील वायनाड मतदारसंघातून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत 15 उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील आणि 24 उमेदवार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक समाजातील होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.