Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: अप्रतिम! चिमुकलीच्या सुंदर वादनाने घातली PM मोदींनाही भुरळ; VIDEO शेअर करत केले कौतुक

PM Modi Share Video: पंतप्रधानांनी हा व्हिडिओ शेअर करत चिमुकलीचे कौतुक केले आहे.

Gangappa Pujari

Viral Video News: सोशल मीडियावर लहान मुलांच्या डान्सचे, गायनाचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामधील लहान मुलांचे टॅलेंटची दिग्गजांनाही भुरळ पडते. सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामधील तिच्या गायन कलेची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भुरळ पडली आहे. काय आहे या व्हायरल (Viral Video) व्हिडिओची संपूर्ण कथा, चला जाणून घेवू...

सोशल मीडियावर, अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये बाल कलाकारांच्या कलागुणांची झलक पाहायला मिळते. सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. आई वडील अगदी जन्मलेल्या बाळाचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर टाकतात. त्यानंतर त्या बाळाचे अनेक गोष्टींचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले जातात. अनेकदा सोशल मीडियावर टाकलेले असेच व्हिडिओ नेटकऱ्यांना भुरळ घालत असतात. ज्यामुळे ही चिमुकली मुलेही रातोरात स्टार होतात.

सध्या एका चिमुकल्याच्या गायनाचा असाच एक सुंंदर व्हिडिओ समोर आला आहे. जिच्या गायनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मोहित केले आहे. पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) हा व्हिडिओ शेअर करत चिमुकलीचे कौतुक केले आहे.

या व्हायरल व्हि़डिओमध्ये एक चिमुकली आईसोबत कन्नड भाषेमध्ये कवितेचे सुरमयी गायन करत आहे. प्रसिद्ध कवी के. एस. नृसिंग स्वामी यांची ही कविता आहे. पल्लवागाला पल्लवीयाली या कवितेचं गायण करत असतानाचा व्हिडीओ खुद्ध पंतप्रधान मोदींनी शेअर केला आहे. 

हा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधानांनी ''हा व्हिडिओ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो. असामान्य प्रतिभा आणि सर्जनशीलता. शाल्मलीला खूप खूप शुभेच्छा'' असा सुंदर कॅप्शन दिला आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून चिमुकलीच्या असामान्य कलेचे तोंडभरुन कौतुक केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT