Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : चल निघ... भटक्या कुत्र्यांनी जंगलच्या राजाला अक्षरश: पिटाळून लावला, व्हिडीओ व्हायरल

गुजरातमधील गीर सोमनाथ भागातील हा व्हिडीओ आहे.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : 'हर अपनी गली में कुत्ता भी शेर होता है', हे तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल. मात्र याचं प्रत्यक्ष चित्र गुजरातमधील गीर सोमनाथ भागात दिसलं. कुत्र्यांनी चक्क सिंहाला पिटाळून लागल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Viral Video)

भटक्या कुत्र्यांची दहशत माणसांमध्ये नेहमी असते. भटक्या कुत्रांनी मुलांवर, माणसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याचे अनेक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. मात्र भटक्या कुत्रांना जंगलचा राजाही घाबरतो, हे या व्हिडीओतून दिसून आलं.  (Latest Marathi News)

गीर सोमनाथच्या सासन सीमेजवळील गावात कुत्र्यांनी सिंहाला घाबरवल्याचा हा व्हिडीओ आहे. रात्रीच्या वेळी शिकारीच्या शोधात असलेला सिंह गावात शिरला होता. सिंहाचा मुक्त संचार गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दरम्यान, भटके कुत्रे सिंहाच्या मागे लागले होते. चार कुत्रे सिंहाच्या मागे लागल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी सिंह अक्षरश: पळून गेला. कुत्रे त्याच्यावर सतत भुंकताना दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डहाणू नगरपरिषदेकडून डहाणू महोत्सवाचे आयोजन, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी लावली हजेरी

Income Tax 2026: महत्त्वाची बातमी! 1 एप्रिलपासून घर, गाडी आणि पगाराचे नियम बदलणार, वाचा संपूर्ण माहिती

Diesel Price Hike: इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका; पेट्रोलनंतर 'या' डिझेलच्या दरात मोठी वाढ

१०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा कॅप्टन खरातच्या आणखी 'करामती'; एकापेक्षा एक कारनामे उघड

Fake Currency Racket: अशोक खरातनंतर आणखी एका बाबाचा कारनामा उघड; आश्रमातच सुरू होताना नको 'तो' प्रकार

SCROLL FOR NEXT