Sakshi Sunil Jadhav
गणेशोत्सवाच्या नंतर लगेचच माहेरवाशीण येणाऱ्या गौराईच्या स्वागताची तयारी आता सुरू झाली आहे.
पहिल्या दिवशी गौराई देवीचे थाटामाटात स्वागत केले जाते. तर दिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.
पुढील माहितीत आपण यंदा गौरी विसर्जनाचा मुहूर्त जाणून घेणार आहोत.
१७ सप्टेंबर २०२६ रोजी गुरुवारी अनुराधा नक्षत्रात संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपूर्वी ज्येष्ठ गौरीचे आवाहन करावे.
१८ सप्टेंबर २०२६ रोजी शुक्रवारी ज्येष्ठा नक्षत्र दिवसभर असल्याने या दिवशी गौरी पूजन आणि नैवेद्य करता येईल.
१९ सप्टेंबर २०२६ रोजी शनिवारी मूळ नक्षत्रात ज्येष्ठ गौरीचे विसर्जन करण्यात येईल.
दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबरला सकाळी ६ वाजून २७ मिनिटांपासून सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत विसर्जनाचा मुहूर्त आहे.
ज्येष्ठ गौरी उत्सवात आवाहन, पूजन आणि विसर्जन असे तीन प्रमुख टप्पे असून प्रत्येक विधी संबंधित नक्षत्रानुसार केला जातो.