Lebanon Missile Attack on Israel Saam TV
देश विदेश

Lebanon Attack on Israel: हमास पाठोपाठ लेबनॉनचाही इस्रायलवर हल्ला; एका भारतीयाचा मृत्यू, दोघे जखमी

Israel-Hamas War Latest News: लेबनॉनमधील एका दहशतवादी संघटनेनं सोमवारी (४ मार्च) सकाळी ११ वाजेच्या सुमारास इस्रायलच्या उत्तर सीमेजवळ क्षेपणास्त्र डागून हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला.

Satish Daud

Lebanon Missile Attack on Israel

एकीकडे इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका उडालेला असताना, या युद्धात आता लेबनॉनने देखील उडी घेतली आहे. लेबनॉनमधील एका दहशतवादी संघटनेनं सोमवारी (४ मार्च) सकाळी ११ वाजेच्या सुमारास इस्रायलच्या उत्तर सीमेजवळ क्षेपणास्त्र डागून हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पटनिबिन मॅक्सवेल असं मृत भारतीयाचं नाव असून तो केरळमधील कोल्लम शहरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तर बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेलविन अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही केरळमधील असल्याचं सांगितलं जातंय.

इस्रायलमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, क्षेपणास्त्र हल्ल्यात जॉर्जला गंभीर दुखापत झाली असून त्याचा चेहरा भाजला आहे. सध्या जॉर्जवर शस्त्रक्रिया केली जात असून असून त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. (Latest Marathi News)

दुसरीकडे, मेल्विनला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उत्तर इस्रायलमधील झिव्ह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो केरळमधील इडुक्की येथील रहिवासी आहे. रिपोर्टनुसार हा क्षेपणास्त्र हल्ला इस्रायलच्या गॅलीली भागात झालाय.

इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, लेबनॉनने डागलेले क्षेपणास्त्र एका शेतात पडले. जिथे काम करणारे लोक त्याच्या प्रभावाखाली आले. हा हल्ला लेबनॉनमधील शिया हिजबुल्ला गटाने केला असल्याचे मानले जाते. या दहशतवादी संघटनेने हमासच्या समर्थनार्थ ८ ऑक्टोबरपासून इस्रायलमध्ये दररोज रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kachya Kelichi Bhaji Recipe : हिरव्यागार कच्च्या केळीची चटपटीत भाजी, मुलं पुन्हा पुन्हा मागून खातील

Unseasonal Rain : साताऱ्यात बळीराजा संकटात, गारांच्या पावसाने जावळीला झोडपलं, गहू, ज्वारी पाण्यात

Suraj Chavan Video : "माझं इतकं मन दुखलंय ना..."; सूरज चव्हाणनं व्यक्त केली नाराजी, 'ती' एक गोष्ट गुलीगत किंगच्या जीवाला लागली

Eyelash Growth: पापण्या कमी असल्यामुळे डोळ्यांचा लूक फिका वाटतो? या सोप्या टिप्सने डोळे दिसतील रेखीव

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

SCROLL FOR NEXT