Expressway Saam
देश विदेश

Political Leader: हायवेवर कार थांबली, निर्वस्त्र महिला बाहेर आली; नेत्यासोबत शरीरसंबंध ठेवताना सीसीटीव्हीत रेकॉर्ड

Leader Caught in Leaked CCTV Footage: मंदसौर जिल्ह्यातील बानी गावचे रहिवासी आणि राजकीय नेते मनोहरलाल धाकड एका आक्षेपार्ह व्हिडिओमुळे अडचणीत सापडले आहेत.

Bhagyashree Kamble

मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील बानी गावचे रहिवासी आणि राजकीय नेते मनोहरलाल धाकड एका आक्षेपार्ह व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये मनोहरलाल आपल्या कारच्या बाहेर निर्वस्त्र स्थितीत असलेल्या महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना दिसत आहेत. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये धाकड यांची गाडी एक्सप्रेसवेवर थांबलेली दिसते. त्यानंतर एक महिला निर्वस्त्र होऊन बाहेर येते. नंतर मनोहरलाल देखील अर्धनग्न अवस्थेत बाहेर येतात. रस्त्याच्या मधोमध दोघेही शरीरसंबंध ठेवतात. हा प्रकार एक्सप्रेसवेच्या लेन ८ वरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच हा व्हिडिओ १३ मे २०२५ रोजीचा असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोहरलाल धाकड हे उज्जैन येथील धाकड महासभेचे राष्ट्रीय मंत्री होते. व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, धाकड यांची पत्नी ही जिल्हा परिषद सदस्य आहेत.

भानपुरा पोलीस ठाण्यात धाकड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एफआयआर दाखल झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

SCROLL FOR NEXT