Rahul Gandhi Repairing Bike Saam TV
देश विदेश

Rahul Gandhi Repairing Bike: राहुल गांधींच्या भारत जोडोची नवी संकल्पना; हातात थेट पान्हा घेत दुरुस्त केली दुचाकी

Rahul Gandhi Viral Photo: पाना फिरवणाऱ्या म्हणजेच भारताची चाके फिरवणाऱ्या हातांकडून शिकले पाहिजे.

Ruchika Jadhav

Rahul Gandhi News: काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेमुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेत. नागरिकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करण्यासाठी राहुल गांधींनी संपूर्ण भारतभर पायी यात्रा केली. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राहुल गांधींनी त्यांची भेट घेत सर्व अडचणी जाणून घेतल्या. अशात सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Rahul Gandi Viral Photo)

राहुल गांधींनी दुचाकी केली दुरुस्त

सोशल मीडियावर राहुल गांधींचा एक फोटो जोरदार व्हायरल होतोय. यात त्यांनी हातात एक स्कू ड्रायव्हर घेतलाय आणि ते दुचाकीतला बिघाड दुरुस्त करत आहेत. यावेळी त्यांच्या शेजारी आणखीन एक कामगार बसलेला दिसतोय. राहुल गांधींनी स्वत: आपल्या ट्वीटर अकाउंटवर हा फोटो पोस्ट केलाय. फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं आहे की, "पान्हा फिरवणाऱ्या म्हणजेच भारताची चाके फिरवणाऱ्या हातांकडून शिकले पाहिजे." फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलेलं हे कॅप्शन सगळ्यांच लक्ष्य वेधून घेत आहे. दिल्लीतल्या करोल बागमधील एका बाईक मेकॅनीकच्या दुकानाला काल राहुल गांधींनी भेट दिली.

भारत जोडो यात्रेनंतर देखील राहुल गांधी त्यांना जमेल त्या पद्धतीने सामान्य जनेतत जात आहेत. तसचे सामान्य नागरिकांच्या मनातील प्रश्न जाणून घेत आहेत. कर्नाटक निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी एका डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटर चालवली होती. त्यावेळी देखील त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. स्कूटर चालवताना त्यांनी त्या मुलाशी बऱ्याच गप्पा केल्या. तसेच त्याच्या मनातील प्रश्न जाणून घेतले.

ट्रकमधील प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल

राहुल गांधी (Rahul Gandhi) अमेरिका दौऱ्यावर होते त्यानंतर त्यांनी ट्रकने प्रवास केला होता. त्यावेळी त्यांनी भारतीय वंशाच्या ट्रक चालकासह बातचीत केली. ट्रकमधून दिल्ली ते चंदीगढ असा प्रवासही केला. संपूर्ण प्रवासात राहुल गांधींनी ट्रक चालकाशी गप्पा मारल्या. त्याच्या मनातील समस्या जाणून घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Rule Change: १ जुलैपासून एलपीजीच्या नियमात होणार मोठा बदल, या ग्राहकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Monday Horoscope : वैवाहिक जीवनातल्या अडचणी दूर होणार, ५ राशींची चांदीच चांदी होणार; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेची पूजा नेमकी किती वाजता करावी? जाणून घ्या शुभ-अशुभ वेळ

Maharashtra News Live Update: सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर लासलगावात जोरदार पाऊस

Crime: बायकोचे शेजारच्यासोबत अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT