Gold Silver Price Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price : खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! सोन्याचा भाव घसरला; तर चांदीही स्थिर, तपासा आजचे दर

Gold Silver Rate In Maharashtra : काल महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : ऐन लग्न सराईचा मुहूर्त संपत आला आणि सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. काल जून महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती.

आज काही प्रमाणात सोन्या चांदीचे भाव स्थिर आहे. जाणून घेऊया आजचा दर

1. आजचा  सोन्याचा (Gold) भाव काय?

गुड रिर्टन्सच्या वेबसाइटनुसार (Website) काल सकाळच्या वेळी सोन-चांदीचे भाव वाढलेले पाहायला मिळाले. या दोन दिवसांत २२ कॅरेट व 24 कॅरेटमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. पण नंतर संध्याकाळी पुन्हा भावात घसरण झाली. दरात प्रति 10 ग्रॅम 150 रुपयांनी घसरले. आज 2 जून रोजी सकाळच्या वेळी भावात कोणताही बदल झाला नाही. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 56,150 रुपये तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 61,250 रुपये इतके आहे. (2nd June 2023 Update)

2. आजचा चांदीचा भाव काय आहे?

सोन्याबरोबरच चांदीच्या (Silver) दरातही किंचित घसरण दिसून आली. काल चांदीचा भाव 768 रुपये १० ग्रॅम होता तर आजच सकाळी झालेल्या नोंदेनुसार १० ग्रॅम चांदीसाठी ७३४ रुपये (Money) मोजावे लागणार आहे.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,505 रुपये

दिल्ली - 61,250 रुपये

हैदराबाद - 61,100 रुपये

कोलकत्ता - 61,100 रुपये

लखनऊ - 61,250 रुपये

मुंबई - 61,100 रुपये

नागपूर - 61,100 रुपये

पुणे - 61,100 रुपये

4. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anu Meena Death Case: मुलांसमोर मारझोड, बायकोच्या तोंडावर थुंकायचा; CCTV व्हिडिओतून समोर आला अभियंता नवऱ्याचा राक्षसी चेहरा

Pune Crime News : पुणे तिथं काय उणे! आंब्याचे पैसे कोण देणार? या क्षुल्लक कारणावरून नवरा-बायकोमध्ये जोरदार हाणामारी

कृषिप्रधान देशाची शोकांतिका! कांद्याला कवडीमोल भाव; नाशिकमधील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Pravin Tarde : 'देऊळ बंद 2' चित्रपट बनवण्यामागचं मुख्य कारण आलं समोर, अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर प्रवीण तरडेंनी सर्वकाही सांगितले

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या वाचा २२ अन् २४ कॅरेट सोन्याचे दर

SCROLL FOR NEXT