Gold Silver Price Down  Saam tv
देश विदेश

Gold Silver Price Down : सुवर्णसंधी ! सोन्या-चांदीचे भाव नरमले, तपासा आजचे दर

Gold Price In Maharashtra : ग्राहकांसाठी सोने खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी आहे.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : अवघ्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत वाढ होत होती. अशातच आज सोन्याच्या चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळाली आहे. लग्नसराईचा मुहूर्त संपण्यासाठी काही दिवस बाकी असताना ग्राहकांसाठी सोने खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी आहे.

आज सराफ बाजारात 22 कॅरेट १० ग्रॅम  सोन्याचा (Gold) भाव 55,370 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 60,450 रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव 74,500 रुपये प्रति किलो झाला आहे. (23rd May 2023 Update )

तर 22 मे सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 60,830 आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 55,720 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.

1. 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी (Silver), जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

2.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

Hair Oiling Tips: ओल्या केसांवर तेल कधी लावावे?

Pune Crime: आईच्या मित्राकडून १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, शाळेत सोडतो म्हणत कारमध्ये बसलवं नंतर...; पुण्यात खळबळ

Maharashtra Live News Update: मंगळवेढ्यात दहा तोतया विद्यार्थ्यांवर कारवाई

Homemade Chutney : तोंडी लावायला काहीच नाहीये? मग ५ मिनिटांत बनवा ही चटपटीत चटणी; दोन चपाती जास्तच खाल

SCROLL FOR NEXT