Sona Chandi Bhav : सराफ बाजारात सोने व चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सात्त्याने पडझड पाहायला मिळाली. परंतु, आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. जाणून घेऊया आजचा दर (Price) किती
भारतीय (India) बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 60 हजाराच्या आत आहे तर 22 कॅरेट सोन्यासाठी खरेदीदारांना 55 हजार प्रति तोळा किंमत मोजावी लागत आहे. जागतिक व देशांतर्गत बाजारा सोन्या-चांदीला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात अचानक उसळी घेतली होती.
1. सोन्या-चांदीचा आज भाव किती ?
गुड रिटर्न्सच्या वेबसाईटच्या मते, सोन्याच्या भावात 400 रुपयांनी घसरण झाली आहे. 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 350 रुपयांनी कमी झाला आहे. आज सराफा बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅमसाठी ग्राहकांना 55,050 रुपये मोजावे लागतील तर 24 कॅरेटसाठी 60050 रुपये मोजावे लागतील. तर चांदीचे दरही 100 रुपयांनी कमी झाले आहेत. आज चांदीचा भाव हा 74,000 प्रति किलो आहे.
2. 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी (Silver), जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.